बांगलादेशमध्ये सध्या महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची स्थिती चिंताजनक असून,(bangladesh) ही घटना मानवी हक्कांसाठी मोठा इशारा ठरतेय. मानवाधिकार संस्थांनी दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, 2025 च्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये देशभरात 342 बलात्कार प्रकरणे नोंदवली गेली आहेत. मात्र या आकड्यापेक्षा प्रत्यक्षात घटनांची संख्या अधिक असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मुलं आणि अल्पवयीन महिलांवर वाढती हल्ले या आकडेवारीतून दिसून येते की, अत्याचाराची शिकार झालेल्या 87% महिला अल्पवयीन, म्हणजे वय 18 वर्षांपेक्षा कमी आहेत. या घटनांमध्ये सहा वर्षांच्या मुलांनाही टार्गेट केले गेले आहे. (bangladesh) तसेच, सामूहिक बलात्कार सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्येही मोठी वाढ झाली आहे. सामूहिक बलात्कारात पीडित महिला देखील बहुतेक अल्पवयीन आहेत.

पोलिस यंत्रणेशी विश्वास कमी मानवाधिकार संस्थांनी स्पष्ट केले आहे की, 342 हा आकडा फक्त नोंद झालेल्या प्रकरणांचा आहे. वास्तवात देशभरात अशा हजारो प्रकरणे घडत आहेत,(bangladesh) पण भीती आणि पोलीस यंत्रणेवरील अविश्वासामुळे अनेकांनी तक्रारच दाखल केली नाही. पीडित महिलांमध्ये पोलीस आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास न राहणे हे मोठे संकट ठरत आहे.
मृतदेहांचा धक्कादायक प्रकार धक्कादायक बाब अशी की, बलात्कार झालेल्या काही महिलांचे मृतदेह मुंडकं नसलेले आढळले आहेत. अनेक प्रकरणांत डोकं शरीरापासून वेगळं करण्यात आलं आहे. अशा मृतदेहांची ओळख पटवणे आणि गुन्हेगारांना पकडणे पोलीस यंत्रणेसाठी मोठे आव्हान ठरत आहे.

गंभीर गुन्हेगारी परिस्थिती बांगलादेशमध्ये महिलांवरील अत्याचार आणि गुन्हेगारी घटना झपाट्याने वाढत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था यंत्रणा नियंत्रणाबाहेर गेली असल्याचे संकेत दिसून येतात. या गंभीर परिस्थितीमुळे मानवाधिकार संस्थांकडून सरकारकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
ही घटना जागतिक स्तरावर महिलांच्या सुरक्षिततेसाठी मोठा इशारा आहे. मुलं आणि अल्पवयीन महिलांवर होणारे हल्ले थांबवण्यासाठी त्वरित कठोर कायदे आणि पोलिस कारवाई आवश्यक आहे.
हेही वाचा :
जुन्या वाहनधारकांसाठी मोठी खुशखबर! 20 वर्षांपर्यंत वाढणार रजिस्ट्रेशन
मोठी बातमी, अजित पवारांनी शेतकरी कर्जमाफीचा सांगितला टायमिंग
MLA बापाची हिरोइन मुलगी, दोन भावांच्या दुश्मनीचे बनली कारण…