सकाळच्या नाश्त्यात किंवा दिवसभर ऊर्जा टिकवण्यासाठी लोक सर्रास ज्यूस पितात. अनेकांना वाटते की ज्यूस हा फळे-भाज्यांचा सर्वात सोपा आणि आरोग्यदायी(health) पर्याय आहे. मात्र, आहारतज्ज्ञ शिल्पा अरोरा यांनी चेतावणी दिली आहे की काही ज्यूस आरोग्याला पोषक नसून उलट नुकसानकारक ठरू शकतात.

१. संत्र्याचा रस
संत्र्यात व्हिटॅमिन सी भरपूर असते आणि ते प्रतिकारशक्तीसाठी उत्तम आहे. परंतु रस काढताना त्यातील फायबर नष्ट होते. फक्त साखर उरल्याने रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी तर हे अधिक धोकादायक आहे. म्हणून संत्र्याचा रस न पिता संत्रे संपूर्ण खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
२. डाळिंबाचा रस
डाळिंब रक्तवाढीसाठी आणि पचनासाठी उपयुक्त मानले जाते. पण रस काढल्यावर त्यातील फायबर नाहीसे होते. फायबर हे आतड्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. रसामुळे फक्त साखरेचे प्रमाण शरीरात जाते, ज्यामुळे रक्तातील साखरेवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे डाळिंब संपूर्ण खाल्ले तरच त्याचे खरे फायदे मिळतात.
३. बीटरूटचा रस
बीटरूट लोह आणि खनिजांचा उत्कृष्ट स्रोत आहे. अनेकजण त्याचा रस पितात, परंतु तज्ज्ञ सांगतात की रस बनवल्यावर पोषकतत्वांची मात्रा कमी होते. शिवाय त्यातील नैसर्गिक साखर रक्तदाब व मधुमेहाच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे बीटरूट सॅलड किंवा भाजीच्या स्वरूपात खाणेच फायदेशीर आहे.

फळे-भाज्या संपूर्ण खाल्ल्यानेच त्यातील फायबर, जीवनसत्त्वे व खनिजे शरीराला मिळतात. त्यामुळे आरोग्य(health) चांगले ठेवायचे असल्यास ज्यूसऐवजी संपूर्ण फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.
हेही वाचा :
आनंद हरतालिकेचा, मनी हा दाटला….!
आज हरतालिकेचा दिवस राशींसाठी भाग्याचा!…
VI App वर गॅलेक्सी शूटर्स फ्रीडम फेस्ट सुरु,….