प्रियकराने(Boyfriend) मैत्रिणीच्या तोंडात जिलेटिनचा स्फोट घडवून तिची हत्या केली आहे. हा धक्कादायक प्रकार नेमका कुठे घडला? तर कर्नाटकातील मैसूर जिल्ह्यातील सालिग्राम तालुक्यातील भेर्या गावात ही घटना उघडकीस आली आहे. तेथे 20 वर्षीय रक्षिता या विवाहित तरुणीची तिच्याच प्रियकराने अमानुष पद्धतीने हत्या केली.

रक्षिता आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी गेली असता, तिचा प्रियकर सिद्धाराजू (रा. बिलिकेरे) याने आधीच तिचा खून करण्याचा कट रचला होता. लॉजमध्ये थांबताना त्याने रक्षिताच्या तोंडात जिलेटिनची रॉड ठेवून स्फोट घडवून आणला. त्यामुळे रक्षिता गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच मृत्यू पावली.
हत्या केल्यानंतर सिद्धाराजूने आपला गुन्हा लपवण्यासाठी ‘मोबाइलचा स्फोट झाला’ अशी बनावट गोष्ट पसरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तपास सुरू केला असता सत्य बाहेर आले आणि सिद्धाराजूच्या भयानक कटाचा भंडाफोड झाला.रक्षिता हुंसूर तालुक्यातील गेरासनहल्ली गावची रहिवासी होती. तिचे लग्न केरळमधील सुभाष नावाच्या तरुणाशी झाले होते. त्यांना दोन वर्षांचा मुलगाही आहे.
तरीही रक्षिताचे तिच्या नातेवाइक असलेल्या सिद्धाराजूसोबत लग्नाआधीपासून प्रेमसंबंध सुरू होते. लग्नानंतरही हे संबंध सुरू राहिले. रक्षिता अन् सिद्धाराजू एकमेकांशी विवाह करण्याच्या विचारात होते, पण रक्षिताच्या घरच्यांनी तिचं लग्न केरळमधील तरुणाशी केलं होतं.

घटनेच्या दिवशी रक्षिता आपल्या माहेरी आली होती. तिने आपल्या कुटुंबीयांना खोटे सांगितले की, केरळमधील सासूबाईंची तब्येत बिघडली आहे. ती त्यांना भेटायला जातेय. जाताना ती मुलाला माहेरीच सोडून गेली. परंतु, प्रत्यक्षात रक्षिता आपल्या प्रियकर (Boyfriend)सिद्धाराजूसोबत के.आर. नगरातील मंदिरात गेली. त्यानंतर सालिग्रामच्या भेर्या गावातील एका लॉजमध्ये थांबली. तिथेच तिच्या खुनाचा कट रचून अमलात आणला गेला.
लॉजमधील कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. तपासानंतर सत्य बाहेर आले. सिद्धाराजूला अटक करण्यात आली. सध्या पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत. रक्षिताची हत्या करण्यामागचे नेमके कारण, हे आता चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा :
Samsung चा नवीन Smart फोन लाँच….
मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांना आईवरुन शिवी दिल्याचा आरोप
विवाहित मुलगी प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत आढळली…