मराठा (Maratha)आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा एक व्हिडीओ भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी शेअर केला होता. या व्हिडीओद्वारे मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या आईला शिवी दिली, असे चित्रा वाघ यांनी म्हटले होते. चित्रा वाघ यांच्या या ट्विटनंतर भाजपचे आमदार प्रसाद लाड, आमदार प्रवीण दरेकर, मंत्री नितेश राणे यांनी मनोज जरांगेंवर हल्लाबोल केला. आता या सगळ्या प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. जो आपल्याला शिवरायांचा मावळा मानत असेल तो खालची भाषा वापरणार नाही. महिलेच्याबाबतीत खालच्या पातळीचं वक्तव्य करणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईविषयी काही बोललोच नाही. मी त्यांच्या आईवर कुठे आणि केव्हा बोललो. परंतु बोलण्याच्या ओघातून माझ्या तोंडातून तसा काही शब्द गेला असेल तर तो मी माघारी घेईन, असं मनोज जरांगेंनी सांगितले. मराठवाड्यात ही बोलीभाषा…मराठवाड्यात ही खेळीमेळीचे वातावरण असतं, असं मनोज जरांगे म्हणाले. तसेच आमच्या आई बहिणींचे डोकं फुटलं तेव्हा दिसलं नाही का?, असा सवालही मनोज जरांगेंनी यावेळी उपस्थित केला.
मनोज जरांगे पाटील, निवडणुका आल्या की तुमची नौटंकी सुरु होते. हा सल्ला समजा किंवा इशारा…छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन तुम्ही मराठा आरक्षणाची गोष्ट करता, परंतु त्याच शिवछत्रपतींनी महिलांचा सन्मान कसा करावा हे आपल्याला शिकवलं. त्याच छत्रपतींच्या महाराष्ट्रात मराठा(Maratha) आरक्षणाच्या नावाखाली दुकानदारी चालवून तुम्ही ज्यापद्धतीने महिलांचा अपमान करताय, असा निशाणा प्रसाद लाड यांनी साधला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईंचा अवमान करताय, हे कदापि सहन केले जाणार नाही! ज्या शरद पवारांनी एवढे वर्ष मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, त्यांचे नाव तुम्ही का घेत नाही? निवडणुका आल्या कि तुमची नौटंकी सुरु होते, अशी टीका प्रसाद लाड यांनी केली.
हेही वाचा :
विवाहित मुलगी प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत आढळली…
गणेशोत्सवाच्या तोंडावर पाऊस, हवामान खात्याने ‘या’ जिल्ह्याला दिला यलो अलर्ट
दरवर्षी दणक्यात गणेशोत्सव साजरा करणारी शिल्पा शेट्टी यंदा मात्र गणपतीच बसवणार नाही