मुंबईत एक धक्कदायक घटना घडल्याचे समोर आले आहे. वाढदिवसाच्या पार्टीत अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध (Medicine)देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढून तिला ब्लॅकमेलही केल्याचा आरोप मुलीने तक्रारीत केला आहे. मागील दोन वर्षांपासून आरोपी मुलीला हे अश्लील व्हिडीओ फोटो दाखवून शारीरिक संबंध ठेवण्याबाबत जबरदस्ती करत होता. गोरेगावच्या रॉयल पॉम व्हिला, आरे कॉलनी येथे आयोजित केलेल्या पार्टीत आरोपीने हे पार्टीत आरोपीने हे कृत्य केल्याचे मुलीने तक्रारीत म्हंटले आहे.

वाढदिवसाच्या पार्टीत अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध (Medicine)देऊन तिच्यावर अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. अत्याचार केल्यानंतर मागील दोन वर्षांपासून आरोपी हा मुलीला हे अश्लील व्हिडीओ फोटो दाखवून शारीरिक संबंध ठेवण्याबाबत जबरदस्ती करत होता. मानसिक तणाव आणि रोजच्या त्रासाला कंटाळून अखेर 17 वर्षीय मुलीने पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी अजिम रहिम खान यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलीस अधिक तपास करत आहेत.
नाशिक मधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीला जबरदस्तीने प्रेमसंबंध ठेवण्यास सांगून सातत्याने तिचा छळ करण्यात येत होता. तसेच इंस्टाग्रामवर फोटो ठेवून बदनामी तिची बदनामी करण्यात आली. या बदामी आणि सातत्याच्या त्रासाला कंटाळून एका मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार. त्यांची मुलगी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतांना कॉलेजमध्ये शिकणारा गणेश भांगरे (20 रा. रामटेकडी झोपडपट्टी तपोवन) अक्षय मदन वरठे (21 रामटेकडी झोपडपट्टी तपोवन) अतिष राजकुमार वैद्य (पूर्ण पत्ता माहित नाही) यांनी मयत मुलीच्या गळ्यात हात घालून काढलेला फोटो इंस्टाग्रामवर ठेवल्याने समाजामध्ये बदनामी झाली. ही बदनामी सहन न झाल्याने तिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

दोघे संशयित कॉलेजमध्ये वेळोवेळी येऊन तिला आरोपी सोबत जबरदस्तीने प्रेमसंबंध ठेवण्यास भाग पाडत होते. या प्रकारामुळे मुलीवर मानसिक ताण निर्माण झाला होता. आरोपींनी फिर्यादीच्या मुलीचे इन्स्टाग्राम युजर आयडी व पासवर्ड वापरून तिचे सोशल मीडिया खाते उघडले. त्यानंतर, तिचा व आरोपी अक्षय वरठे याचा गळ्यात हात घालून काढलेला फोटो त्या इन्स्टाग्राम खात्यातून अक्षय वरठे याच्या इन्स्टाग्रामवर पाठवून तो तिचा बॉयफ्रेंड आहे, असा मजकूरसुद्धा लिहून फोटो पोस्ट केला. त्यामुळे मुलीची समाजात आणि कॉलेजमध्ये बदनामी झाली.
त्यानंतर गणेश भांगरे नामक व्यक्तीने मुलीला फोन करून अश्लील आणि अपमानास्पद भाषेत शिवीगाळ केली. त्याचप्रमाणे, तिच्याविरोधात सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर पसरवून तिचा मानसिक छळ केला. या सर्व प्रकारांच्या एकत्रित परिणामामुळे नैराश्यातून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी आरोप केला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी फिर्यादीने केली आहे. दरम्यान या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :
8 वी उत्तीर्ण उमेदवारांनाही सरकारी नोकरीची संधी
यूट्यूबर अन् इन्फ्लूएन्सर्साठी नवीन नियम…..
ऑनलाईन गेमिंग विरोधात केंद्र सरकार झाले ‘सक्त’