नांदेडमधून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. जन्मदात्या वडिलांनी आपल्या विवाहित (Married)मुलीची आणि तिच्या प्रियकराची हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्या केल्यानंतर तिच्या प्रियकराची हत्या करून मृतदेह चाळीस फूट खोल आणि वीस ते तीस फूट पाणी असलेल्या विहरीत फेकले. त्यानंतर स्वतः पोलीस ठाण्यात हजार होऊन घटनेची माहिती दिली. ही घटना नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील गोळेगाव येथे घडली आहे. हत्या झालेल्या मुलीचे नाव संजीवनी कमळे,आणि लखन बालाजी भंडारे अशी मयतांची नावे आहेत. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने मुलीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढले, तर मुलाचा शोध सुरूच होता. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

संजीवनी हिचं एका वर्षांपूर्वी गोळेगाव येथील सुधाकर कमळे या मुलासोबत संजीवनीच विवाह(Married) झाला होता. कुटुंबीयांनी मोठ्या थाटात दोघांचा विवाह केला होता. विवाहापूर्वी संजीवनीच लखन भंडारे या तरुणासोबत प्रेम प्रकरण सुरु होत. लग्नानंतर देखील या दोघांचा संभाषण सुरु होता. सोमवारी संजीवनीच्या सासरचे मंडळी बाहेर गेल्याने संजीवनी हिने आपल्या प्रियकराला घरी बोलावले. अचानक घरी परतलेल्या पती आणि सासरच्या मंडळींनी संजीवनी आणि तिच्या प्रियकराला नको त्या अवस्थेत बघितले. त्यानंतर संजीवनीच्या पतीने सासऱ्यांना फोन करून बोलावले आणि मुलीला घरी घेऊन जाण्यास सांगितले.

मुलीचे वडील मारोती सुरणे, काका माधव सुरणे आणि आजोबा लक्ष्मण सुरणे हे तिघे जण मुलीच्या सासरी गोळेगावला पोहचले. गोळेगाव आणि बोरजुन्नी हे आजू बाजूला गावं आहे. आरोपींनी मुलीला आणि तिच्या प्रियकराला घेऊन जातं असताना करकाळा शिवारात दोघांना मारहाण करून त्यांची हत्या केली, त्यानंतर चाळीस फूट खोल असलेल्या विहरीत दोघांचे मृतदेह फेकून दिले. घटनेनंतर सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मुलीचे वडिल मारोती सुरणे हे उमरी पोलीस ठाण्यात पोहचले आणि मी मुलीला आणि तिच्या प्रियकराला मारून विहरीत फेकलं आहे अशी माहिती दिली.

हे ऐकताच पोलीस दंग झाले. पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी नेले. सायंकाळी सात वाजता मुलीचे प्रेत बाहेर काढण्यात आले तर मुलाच्या मृतदेहाचा शोध सुरू केला. दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी उमरी पो स्टे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी घटनास्थळीचा पंचनामा केला. या प्रकरणी उमरी पोलीस ठाण्यात मुलीचे आजोबा लक्ष्मण सुरणे, वडील मारोती सुरणे आणि काका माधव सुरणे या तिघांना ताब्यात घेतले. या घटनेने खळबळ उडाली आहे.

हेही वाचा :

गणेशोत्सवाच्या तोंडावर पाऊस, हवामान खात्याने ‘या’ जिल्ह्याला दिला यलो अलर्ट

दरवर्षी दणक्यात गणेशोत्सव साजरा करणारी शिल्पा शेट्टी यंदा मात्र गणपतीच बसवणार नाही

हे ज्यूस प्यायल्यास आरोग्याला होऊ शकते नुकसान…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *