भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएलने पुन्हा एकदा त्यांच्या लाखो ग्राहकांसाठी एक उत्तम ऑफर (offer)जाहीर केली आहे. यावेळी कंपनीने ब्रॉडबँड वापरकर्त्यांसाठी एक खास ऑफर जाहीर केली आहे. प्रत्यक्षात, सरकारी टेलिकॉम कंपनीने आता त्यांच्या ब्रॉडब्रँड वापरकर्त्यांसाठी तीन महिन्यांसाठी मासिक दारात सूट जाहीर केली आहे. इतकेच नाही तर कंपनी पहिल्या महिन्यासाठी मोफत सेवा देखील देत आहे. या ऑफरद्वारे तुम्हाला एकूण चार ब्रॉडबँड सेवा मिळतील. चला त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

खरंतर, ही नवीन ऑफर BSNL च्या फायबर बेसिक आणि फायबर बेसिक निओ प्लॅनवर उपलब्ध असेल. फायबर बेसिक प्लॅनची किंमत ४९९ रुपये आहे, ज्यामध्ये तुम्हाला 60Mbps पर्यंत स्पीड आणि 3,300GB डेटा मिळतो. तर डेटा संपल्यानंतर, स्पीड 4Mbps पर्यंत कमी होईल. कंपनीच्या मते, या प्लॅनवर तीन महिन्यांसाठी १०० रुपयांची सूट मिळेल. म्हणजेच ग्राहकांना फक्त ३९९ रुपये प्रति महिना या किमतीत याचा आनंद घेता येईल.
फायबर बेसिक निओ प्लॅनची किंमत ४४९ रुपये आहे, ज्यामध्ये तुम्हाला 50Mbps पर्यंत थोडा कमी स्पीड मिळणार आहे. या प्लॅनमध्ये एकूण 3,300GB डेटा देखील मिळत आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला ५० रुपयांची सूट मिळणार आहे. डिस्काउंटनंतर, या प्लॅनची किंमत देखील ३९९ रुपयांपर्यंत कमी होते. दोन्ही प्लॅनमध्ये अमर्यादित लोकल आणि STD कॉलिंग सुविधा देखील दिली जात आहे.
विशेष म्हणजे या ऑफर (offer)अंतर्गत, ग्राहकांना पहिल्या महिन्यासाठी मोफत सेवा मिळेल. त्यानंतर, तुम्हाला पुढील तीन महिन्यांसाठी ब्रॉडबँड प्लॅनवरही सूट मिळेल. अशा प्रकारे, BSNL ची ही ऑफर तुम्हाला एकूण चार महिन्यांसाठी कॉलिंग आणि डेटा बेनिफिट्स देईल.

सॅमसंग इंडियाने आपला नेक्स्ट-जेनरेशन मोबाइल सीटी उत्पादन पोर्टफोलिओ भारतात लाँच केला आहे, ज्यामध्ये रुग्ण-केंद्रित डिझाइन, एआय-सहाय्यक इमेजिंग आणि गतिशीलतेचा संगम आहे. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लिमिटेडची उपकंपनी न्यूरोलॉजिका यांच्या सहकार्याने आणलेल्या या सीटी स्कॅनर श्रेणीमुळे रुग्णांना बेडवरच इमेजिंग सुविधा मिळणार असून, सुरक्षितता वाढेल आणि उपचार निर्णय जलद घेता येतील. हे सोल्यूशन्स मेट्रो तसेच ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णालयांनाही सक्षम करतील.
या पोर्टफोलिओमध्ये सेरेटॉम एलाइट, ओम्नीटॉम एलाइट, ओम्नीटॉम एलाइट पीसीडी आणि बॉडीटॉम ३२/६४ यांचा समावेश आहे. सेरेटॉम एलाइट ८-स्लाइस स्कॅनर असून २ तास बॅटरी क्षमतेसह कार्यक्षम इमेजिंग करतो. ओम्नीटॉम एलाइटमध्ये ४० सेमी ओपनिंग, अल्ट्रा हाय रिझोल्यूशन मोड आणि १.५ तास बॅटरी क्षमता आहे, तसेच डीप ब्रेन स्टिम्युलेशनसारख्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याची क्षमता आहे. ओम्नीटॉम एलाइट पीसीडीमध्ये प्रगत फोटॉन काउंटिंग डिटेक्टर तंत्रज्ञान असून उच्च दर्जाचे इमेजेस आणि सुधारित आर्टिफॅक्ट रिडक्शन मिळते. बॉडीटॉम ३२/६४ हे पूर्ण शरीरासाठी डिझाइन केलेले ३२/६४ स्लाइस स्कॅनर असून ८५ सेमी ओपनिंग आणि १२ तास टिकणारी लिथियम पॉलिमर बॅटरी आहे.
हेही वाचा :
उन्हामुळे होतो स्कीन कॅन्सर! ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मायकेल क्लार्कची शस्त्रक्रिया
1 सप्टेंबरपासून चांदीच्या दागिन्यांसाठी नवा नियम लागू! जाणून घ्या नवीन नियम?
खासगी नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी! कामाचे तास वाढणार, नवा नियम लवकरच लागू होणार