ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट कर्णधार मायकेल क्लार्क एका गंभीर आजारामुळे चर्चेत आला आहे.(cricket) खरं तर त्याच्या त्वचेच्या कर्करोगामुळे त्याच्या नाकावर सहावी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. क्लार्कने २९ ऑगस्ट रोजी इंस्टाग्रामवर पोस्ट करत माहिती दिली की, ”ऑस्ट्रेलियामध्ये त्वचेच्या कर्करोग हा सामान्य आजार आहे. मी स्वतः अनेकदा या आजाराला सामोरे गेलो आहे.” २००६ मध्ये पहिल्यांदा त्याला या आजाराची लागण झाली आणि पुन्हा एकदा नाकातून गाठ काढण्यात आली आहे. क्रिकेटपटू म्हणून तासनतास उन्हात खेळल्यामुळेच हा आजार झाला असल्याचे त्याने म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये ऊन खूप तीव्र असल्यामुळे त्वचेच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त वाढले आहे. या आजाराचे मुख्य कारण म्हणजे सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे त्वचेतील पेशींमध्ये होणारे बदल. (cricket)गोरी त्वचा, कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास किंवा कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांना हा आजार होण्याचा धोका अधिक असतो.
त्वचेच्या कर्करोगाचे तीन प्रकार आहेत.
१. बेसल सेल कार्सिनोमा
२. स्क्वॅमस सेल कार्सिनोमा
३. सर्वात धोकादायक मेलेनोमा.

यामध्ये क्लार्कला नॉन-मेलेनोमा प्रकार असल्याचे सांगितले जाते. डॉक्टरांच्या मते, जर त्वचेवर नवीन गाठ, डाग किंवा जखम बरी न होणे यासारखी लक्षणं दिसली तर त्वरित तपासणी करावी. (cricket)योग्य वेळी निदान झाल्यास ९५ टक्के रुग्ण बरे होऊ शकतात. त्यामुळे त्वचेची नियमित तपासणी आणि उन्हात स्वतःचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे.
हेही वाचा :
सोनाक्षी सिन्हाच्या ‘Jatadhara’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्रीची एन्ट्री
ISRO देणार मोफत ट्रेनिंग! शिक्षणही आणि थोडेफार पैसेही; कसे करावे अर्ज?
रस्त्यावरच अंघोळी अन् तिथेच आराम… Maratha Reservation Morcha चे Video Viral