पीपीएफ आणि एसआयपी हे दोन्ही गुंतवणुकीसाठी उत्तम (investment)पर्याय आहेत. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही कुठे गुंतवणूक करू शकता. जाणून घेऊया.

तुम्हाला गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय खुले आहेत. पण, नेमकी गुंतवणूक कुठे करावी, हा प्रश्न अनेकांचा असतो. कारण, वेगवेगळे पर्याय असल्याने अनेकांचा गोंधळ उडतो.(investment) अशा वेळी योग्य मार्ग माहिती असणं गरजेचं आहे. पीपीएफ आणि एसआयपी हे दोन्ही गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहेत. आज आम्ही तुम्हाला याचविषयी माहिती सांगणार आहोत. चला तर मग याविषयीची माहिती पुढे विस्ताराने जाणून घेऊया.
पीपीएफ आणि एसआयपी हे दोन्ही गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहेत, जिथे तुम्ही थोडी रक्कम गुंतवू शकता आणि चांगला फंड जमा करू शकता. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की या दोन पैकी कोणत्या योजनेत तुम्ही गुंतवणूक करू शकता आणि जास्त निधी गोळा करू शकता. चला जाणून घेऊया.
पीपीएफमध्ये 1000 रुपयांच्या गुंतवणुकीवर परतावा
जर तुम्ही पोस्ट ऑफिस पीपीएफ योजनेत 15 वर्षांसाठी दरमहा 1000 रुपये म्हणजेच दरवर्षी 12,000 रुपये गुंतवत असाल तर तुम्ही पीपीएफ योजनेत एकूण 1,80,000 रुपयांची गुंतवणूक कराल. पीपीएफ योजना 7.1 टक्के दराने परतावा देते. यामध्ये मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण 3,15,000 रुपये मिळतील. येथे तुम्हाला 1.45 लाख रुपयांचा नफा मिळेल.
एसआयपीमध्ये 1000 रुपयांच्या गुंतवणुकीवर परतावा
जर तुम्ही एसआयपीमध्ये दरमहा 1000 रुपये गुंतवले आणि ते 15 वर्ष चालू ठेवले तर तुमची एकूण गुंतवणूक 1,80,000 रुपये होईल. 12 टक्के परतावा मिळाल्यास 15 वर्षांनंतर तुम्हाला 4,75,931 रुपये मिळतील. यामध्ये तुम्हाला एकूण 2,95,931 रुपयांचा फायदा मिळणार आहे.
म्युच्युअल फंड एसआयपीसह रिटायरमेंट फंड तयार करा
एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडातील गुंतवणूक हळूहळू लोकांमध्ये खास होत आहे. म्युच्युअल फंड एसआयपीत दरमहिन्याला थोडी फार गुंतवणूक करून कोट्यवधी रुपयांचा निधी गोळा करू शकता. तुम्हाला तुमची गुंतवणूक दीर्घकाळ सुरू ठेवावी लागते.
म्युच्युअल फंड एसआयपीतून तीन कोटींचा निधी
आता 25 वर्षांचे असाल तर तुम्ही तुमचे रिटायरमेंट प्लॅनिंग आतापासूनच सुरू केले पाहिजे. म्युच्युअल फंड एसआयपीची खासियत यात तुम्हाला जास्त गुंतवणूक करावी लागत नाही, थोडीशी गुंतवणूक करावी लागते. जर रोज 100 रुपयांची बचत केली आणि म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये 35 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुम्ही 3 कोटी रुपयांपर्यंतचा फंड जोडू शकता.
हेही वाचा :
सोनाक्षी सिन्हाच्या ‘Jatadhara’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्रीची एन्ट्री
ISRO देणार मोफत ट्रेनिंग! शिक्षणही आणि थोडेफार पैसेही; कसे करावे अर्ज?
रस्त्यावरच अंघोळी अन् तिथेच आराम… Maratha Reservation Morcha चे Video Viral