ISRO मध्ये काम करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. ISRO ने अप्रेन्टिस पदासाठी ही भरती सुरु केली आहे. अभियांत्रिकी तसेच तांत्रिक क्षेत्रातील विद्यार्थी (student)या अप्रेन्टिस पदासाठी अर्ज करू शकतात. या भरतीमध्ये निवड होणाऱ्या उमेदवाराला फक्त काम करताच नव्हे तर काम शिकताही येणार आहे.

ISRO ने सुरु केलेल्या या भरतीसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले आहे. जर तुम्ही या भरतीसाठी इच्छुक असाल तर कसलाही विलंब न करता तुम्ही निकषांना पात्र ठरत आहात का? याची खात्री करून घ्या. उमेदवारांना ११ सप्टेंबर पर्यंत या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. विविध पदांसाठी अर्ज करता येणार असून विविध पदांसाठी वयोमर्यादा तसेच शिक्षणासंबंधित अटी व निकषही भिन्न आहेत.
या भरतीमध्ये विविध शाखांतील पदांचा समावेश करण्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक्स व संचार अभियांत्रिकी शाखेत २ पदे, कम्प्युटर सायन्स अभियांत्रिकीमध्ये २ पदे, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये ३ पदे, सिव्हिल अभियांत्रिकीमध्ये १ पद, तर मेकॅनिकल अभियांत्रिकी शाखेत १ पद अशी पदे उपलब्ध आहेत. तसेच लायब्ररी सायन्ससाठी २ पदे ठेवण्यात आली आहेत.

डिप्लोमा धारक उमेदवारांसाठीही संधी असून ट्रेनीशियन अप्रेंटिससाठी ३० पदे आणि डिप्लोमा कमर्शियल प्रॅक्टिससाठी २५ पदांची भरती केली जाणार आहे. याशिवाय पदवीधरांमध्ये बी.ए. साठी १०, बी.एस्सी. साठी १० तर बी.कॉमसाठीही पदांचा समावेश करण्यात आला आहे. संबंधित क्षेत्रात शिक्षण झाले असून जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचीचा आढावा घेत तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.
सुरुवातीला स्टायपेंड ८ ते ९ हजार रुपये मिळणार असून ही अप्रेंटिसशिप वर्षभराची आहे. वर्ष पूर्ण होताच हातात कामाचा सर्टिफिकेट मिळून जाईल.बँक ऑफ बडोदा LBO पदासाठी ऍडमिट कार्ड जाहीर! अशा प्रकारे करा डाउनलोडया भरतीसाठी उमेदवारांना उमंग पोर्टलवरून अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट https://web.umang.gov.in/ या ठिकाणी भेट द्यावी लागेल. नोंदणी करताना केवळ आपली सक्रिय ई-मेल आयडीच वापरावी. त्यानंतर आपली मूलभूत माहिती, शैक्षणिक माहिती, पत्ता आणि संबंधित सर्व तपशील नीट भरावेत.
फोटो जास्तीत जास्त 50KB आणि स्वाक्षरीही जास्तीत जास्त 50KB आकारात अपलोड करणे आवश्यक आहे. अर्जामध्ये जे तपशील मागवले जातील ते सर्व काळजीपूर्वक भरावेत. स्पेलिंगमध्ये कोणतीही चूक होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी, कारण फॉर्म सबमिट केल्यानंतर त्यात बदल करण्याची परवानगी मिळणार नाही. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याचा प्रिंट आउट काढून ठेवणे आवश्यक आहे(student).
हेही वाचा :
सोनाक्षी सिन्हाच्या ‘Jatadhara’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्रीची एन्ट्री
पनीरच्या नावाखाली ‘चीझ अॅनालॉग’ची विक्री; ‘चीझ अॅनालॉग’ म्हणजे काय?
दुरुस्तीच्या नावाखाली घोटाळा; मोबाईलमधून प्रायव्हेट व्हिडीओ लिक