नागपूरमध्ये इंडिगोच्या एका विमानाचे(plane) आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. इंडिगोचे विमान नागपूरहून कोलकात्याला जात होते. विमान 6E812 ने उड्डाण करताच, एक पक्षी हवेत आला आणि इंजिनला धडकला. उड्डाणानंतर काही वेळातच पक्ष्याची विमानाला धडक बसली यामुळे विमानाचा पुढचा भाग खराब झाला. परंतु वैमानिकाने हवेत यू-टर्न घेण्याचा निर्णय घेतल्याने नागपुरात आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

इंडिगोचे 6E812 विमान आज (2 सप्टेंबर) सकाळी 7 वाजून 5 मिनिटाने उड्डाण घेतली. आकाशात झेप घेताच एका पक्षाने धडक दिली. मिळालेल्या माहितीनुसार, पक्षी धडकल्याने विमानाच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले. सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.या विमानात माजी आमदार सुधाकर कोहळे, शेखर भोयर आणि काँग्रेस नेते नितीन कुंभलकर प्रवास करत होते.

विमानाच्या (plane)आपत्कालीन लँडिंगनंतर आता वरिष्ठ विमानतळ संचालक आबिद रुही यांचे विधान समोर आले आहे. ते म्हणाले की, इंडिगोच्या नागपूर-कोलकाता फ्लाइट क्रमांक 6E812 वर पक्षी धडकण्याची शक्यता आहे. आम्ही या घटनेची चौकशी करत आहोत,अशी माहिती यावेळी देण्यात आली.

इमर्जन्सी लँडिंगमागील कारण पक्षी धडक म्हणजेच पक्ष्यांची टक्कर होती. विमान वाहतूक उद्योगात पक्ष्यांची टक्कर हा एक गंभीर धोका मानला जातो. विशेषतः टेक-ऑफ आणि लँडिंगच्या वेळी, तो गंभीर धोका निर्माण करू शकतो. अनेक वेळा पक्षी धडकल्याने, इंजिनमध्ये पक्षी अडकल्याने तांत्रिक बिघाड होऊ शकतो. पक्षी धडकल्याने विमानाचे ऑपरेशन धोक्यात येऊ शकते.

यापूर्वी २ जून रोजी असाच एक प्रकार उघडकीस आला होता. झारखंडची राजधानी रांचीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला पक्षी धडकल्यानंतर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. अधिकाऱ्यांनी सांगितले होते की पक्ष्यांच्या टक्करमुळे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आणि विमानातील सर्व १७५ प्रवासी सुरक्षित होते. दरम्यान रांचीच्या बिरसा मुंडा विमानतळाचे संचालक आरआर मौर्य म्हणाले होते की, रांचीजवळ इंडिगोचे विमान एका पक्ष्याशी आदळले. ही घटना सुमारे ३,००० ते ४,००० फूट उंचीवर, सुमारे १० ते १२ नॉटिकल मैल अंतरावर घडली.

१७ जुलै २००० – अलीन्स एअर विमान पटना विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करताना कोसळले. या अपघातात ६२ प्रवाशांपैकी ६० जणांचा मृत्यू झाला.

४ सप्टेंबर २००९ – एअर इंडिया एक्सप्रेस विमान मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळ, कर्नाटक येथे उतरायचा प्रयत्न करताना कोसळले. या अपघातात तासलेले १६६ प्रवाशांपैकी १५८ मृत्यू झाले.

७ ऑगस्ट २०२० – एअर इंडिया एक्सप्रेस विमान केरळमधील करिपूर विमानतळ (कालीकट आंतरराष्ट्रीय विमानतळ) वर उतरायचा प्रयत्न करताना कोसळले. यात १६५ प्रवाशांपैकी २१ जण मृत्यूमुखी पडले.

हेही वाचा :

दिग्गज खेळाडूंने T20 क्रिकेटला केला रामराम!

बाप्पाच्या निरोपास पावसाची हजेरी; राज्यात पुन्हा मुसळधार! कोणत्या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा?

आता हायड्रोजन बॉम्ब फोडणार, मोदी जनतेला चेहरा दाखवू शकणार नाही: राहुल गांधींचा मोठा दावा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *