कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी 2026/20 27 या आर्थिक (Budget)वर्षाचा अर्थसंकल्प रविवारी संसदेत सादर केला.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उगारलेल्या टेरिफ कार्ड शस्त्राला निष्प्रभ करण्यासाठी दूरगामी परिणाम साधणाऱ्या ठोस उपाययोजनांची निर्मिती या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केलेली आहे. आत्मनिर्भरता केंद्रस्थानी ठेवलेल्या या अर्थसंकल्पात संरक्षण सिद्धतेवर भर देऊन शेजारच्या त्रासदायक राष्ट्रांना योग्य तो इशारा देण्याचा प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केलेला आहे.रशियाकडून इंधन खरेदी केल्याचा राग मनात ठेवून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अन्यायकारक आयात शुल्क लावले आहे. त्याचा विपरीत परिणाम भारताच्या व्यापार व्यवहारावर झालेला आहे पण त्यावर मात करण्यासाठी भारताने नुकताच युरोपियन संघाशी व्यापार करार केलेला आहे. हा करार म्हणजे ट्रम्प महाशयांना दिलेली चपराक म्हणावी लागेल आणि आता त्या पाठोपाठ ट्रम्प यांचे टेरिफ कार्ड शस्त्र निष्प्रभ करण्याचा संकल्प केला आहे. एकाच महिन्यात केलेल्या या दोन कृतीमुळे ट्रम्प महाशय संतापले नाही तरच नवल.दरवर्षी अर्थसंकल्प सादर होण्याच्या आधी आयकरात सूट किती मिळते इकडे संपूर्ण करदात्यांचे लक्ष लागून राहिलेले असते. या अर्थसंकल्पात आयकर प्रणाली आहे तशीच ठेवलेली आहे. त्यात कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही किंवा सवलतही दिलेली नाही.

आत्मनिर्भरता समोर ठेवून उद्योगात वाढ व्हावी आणि नवे (Budget)रोजगार उपलब्ध व्हावेत तसेच शेतकरी, सुशिक्षित कुशल मनुष्यबळ,संरक्षण सिद्धता, याचा विचार या अर्थसंकल्पात विचार केलेला आहे. केंद्र शासनाकडून महाराष्ट्राला जवळपास एक लाख कोटी रुपये मिळणार आहेत. रेल्वे सुधारणांसाठी महाराष्ट्राला तीस हजार कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत आणि म्हणूनच करवीरवासीयांच्या आशा आता पल्लवीत झाल्या आहेत. कोल्हापूर ते वैभववाडी हा रेल्वे प्रकल्प आता गती घेणार असून 107 किलोमीटर लांबीच्या या रेल्वे मार्गाच्या कामाला पुढील वर्षी म्हणजे 2027मध्ये प्रारंभ होणार आहे. गेल्या 40 वर्षांची मागणी मूर्त स्वरूपात येते आहे. या मार्गाची आठ वर्षांपूर्वी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घोषणा केली होती. पण आता त्याचा मुहूर्त पुढील वर्षी होणार आहे. रेल्वे कॉरीडारच्या माध्यमातून महत्त्वाचीआठ शहरे सुपरफास्ट रेल्वेने जोडली जाणार आहेत.पाच लाख लोकसंख्या असलेल्या शहरांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या अर्थसंकल्पात 12 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे आणि त्याचा प्रत्यक्ष फायदा कोल्हापूरलाही होणार आहे.

चैनीच्या वस्तू किंवा लक्झरी गुड्स परदेशातून आयात होऊ नयेत, (Budget)भारतीय उत्पादकांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांची खरेदीमोठ्या प्रमाणावर व्हावी यासाठी बऱ्याचशा वस्तू स्वस्त केलेल्या आहेत. लोकांनी भारतीय बाजारपेठेतच खरेदी करावी हा त्यामागचा विचार आहे.नेहमीप्रमाणेच सिगारेट, मद्य यावरील कर वाढवलेले आहेत. अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी सर्व घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प मांडला आहे. सध्या देशात कोणत्याही निवडणुका नजीकच्या टप्प्यात नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला खुश करण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही. अर्थसंकल्प मांडताना केंद्रीय किंवा राज्याचे अर्थमंत्री ज्या सवलती जाहीर करतात, त्यात खाली पर्यंत झिरपत येतातच असे नाही. सर्वसामान्य माणसाचे महिन्याचे बजेट कोसळू नये.
महागाई नियंत्रित असावी.

जगण्याची लढाई सुसह्य व्हावी इतकीच अपेक्षा सामान्य माणसाची असते. (Budget)जीवनावश्यक वस्तू स्वस्त झाल्या पाहिजेत. काही महिन्यापूर्वी सेवा वस्तू करा मध्ये सवलती जाहीर केल्या होत्या. त्यामुळे वाहन उद्योगाला चालना मिळाली होती. वाहनांसह इतरही काही वस्तू स्वस्त झाल्या होत्या किंवा झाल्या आहेत.यंदाच्या अर्थसंकल्पाला ट्रम्प यांच्या टेरिफ कार्ड शस्त्राची पार्श्वभूमी होती. भारत हा जगातील तिसरी आर्थिक महासत्ता बनला पाहिजे याचेही भान या अर्थसंकल्पात ठेवण्यात आले आहे.
महागाई नियंत्रित करण्याचा, रोजगाराच्या संधी वाढवण्याचा, उद्योगाना बुस्टर डोस देण्याचा,आयात शुल्क कमी करण्याचा, शेतकरयांना सक्षम करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

हेही वाचा :

एकाच दगडात अनेक पक्षी गार; शरद पवारांचा ‘पॉवर’गेम

8 व्या वेतन आयोगाने वेग पकडला, केंद्रीय कर्मचाऱ्यांना बजेटमध्ये मिळणार सरप्राइज?

सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी, बारामतीत घडामोडींना वेग

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *