मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनाविरोधात दाखल याचिकेवर काही वेळात सुनावणी होणार आहे. यासाठी मराठा समाजाकडूनही ताकद लावण्यात आली आहे. या सुनावणीत मराठा समाजाची बाजू मांडण्यासाठी हाय प्रोफाईल वकील(lawyer) मैदानात उतरण्यात आला आहे. ज्येष्ठ विधीज्ञ सतीश मानेशिंदे मराठा आंदोलकांची बाजू न्यायालयात मांडणार असल्याची माहीत समोर आली आहे.

सतीश मानेशिंदे यांची देशात हाय प्रोफाईल वकील(lawyer) म्हणून ओळख आहे. त्यांच्या आजपर्यंतच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक नामांकित बॉलीवूड कलाकारांचे खटले त्यांनी लढले आहेत. 2019 साली बॉलीवडू अभिनेता सुशांतसिंह राजपूतचे निधन झाले, त्यानंतर या प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा खटला सतीश मानेशिंदे यांनी लढवला. याशिवाय अभिनेता संजय दत्त, सलमान खान यांसारख्या कलाकारांचे खटलेही त्यांनी लढले आहेत.

सतीश मानेशिंदे यांचे मूळ गाव कर्नाटकातील धनोआ येथील आहे. कर्नाटकातच त्यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर त्यांनी मुंबई गाठली. १९८३ साली त्यांनी वकिलीला सुरूवात केली. करियरच्या सुरूवातीलाच त्यांनी देशातील दिग्गज वकील राम जेठमलानी यांचे असिस्टंट म्हणून काम केले. राम जेठमलानी यांच्यासोबत काम करतानाच त्यांनी वकिलीतील बारकावे, डावपेच आत्मसात केले. त्यानंतर त्यानंतर त्यांनी राजकारणातील आणि हायप्रोफाईल खटले स्वीकारण्यास सुरूवात केली.

सतीश मानेशिंदे यांचे नाव पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले ते 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटावेळी. 1993 या प्रकरणात त्यांनी अभिनेता संजय दत्त यांची बाजू मांडली होती. सतीश मानेशिंदे यांच्या कायदेशीर दांवपेचांमुळे संजय दत्त यांना जामिन मिळाला होता. 2002 मध्ये सतीश मानेशिंदे यांनी अभिनेता सलमान खान यांचेही काही महत्त्वाचे खटले हाताळले.

काळवीट शिकार प्रकरण आणि ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणात त्यांनी सलमान खान यांना जामीन मिळवून दिला. पुढे ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणात सलमान खान निर्दोषही सुटले. सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर झालेल्या तपासादरम्यान अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा खटला हाताळल्यामुळे सतीश मानेशिंदे पुन्हा एकदा चर्चेत आले. माध्यमांच्या वृत्तानुसार, एका सुनावणीसाठी सतीश मानेशिंदे सुमारे 10 लाख रुपये मानधन घेतात.

हेही वाचा :

हीरोपंती की पागलपंती? रिलसाठी रेल्वे ट्रॅकवर झोपला तरुण; इतक्यात ट्रेन आली अन्…; Video Viral

मनोज जरांगेंना आझाद मैदान रिकामं करण्याची नोटीस, जरांगे म्हणाले, मेलो तरी मैदान सोडणार नाही!

मराठ्यांना ओबीसीमधूनच हवंय आरक्षण, मात्र OBC विद्यार्थ्यांना…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *