गेल्या 22 तासांपेक्षा जास्त कालावधीपासून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (Expressway) प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. आडोशी बोगद्यावाजवळ टँकर पलटी झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. त्यातच आता राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या सर्व एसटी बस रद्द करण्यात आल्या आहेत. एसटीने याबाबतचा निर्णय घेतला आहे. द्रुतगती मार्गावर 22 तासांपासून वाहतूक ठप्प झाली आहे.टॅंकर पलटी झाल्याने द्रुतगती मार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. 22 तास उलटून गेले तरी वाहतूक पूर्ववत झालेली नाही. अन्न, पाण्याशिवाय प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे. मात्र तरी देखील सरकार गप्प बसून असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. मार्गावरून टॅंकर काढण्यात प्रशासनाला अपयश आल्याचे समोर आले आहे. आता या सर्व परिस्थितीवर मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बस रद्द करण्यात आली आहेत.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने मुंबईकडे जाणाऱ्या सर्व एसटी बस बंद केल्या आहेत. (Expressway) त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई पुणे एक्सप्रेसवर वाहतूक विस्कळीत झाली आहे. एसटी महामंडळाच्या अनेक बसेस यामध्ये अडकून पडल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या घटनेचा परिणाम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस सेवांवर झाला आहे. परिवहन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, या अपघातानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यातील विविध विभागांमधील एकूण 139 बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामध्ये 37 ई-शिवनेरी व 66 इतर बस फेऱ्यांचा समावेश आहे.

तसेच, या एक्सप्रेस वेवर महाराष्ट्र राज्य परिवन विभागाची (Expressway) एकूण 163 वाहने वाहतूक कोंडीत अडकली होती. यामध्ये सातारा विभागातील 46, सोलापूर विभागातील 36, पुणे विभागातील 20, सांगली विभागातील 18, कोल्हापूर विभागातील 13, पालघर विभागातील 12, ठाणे विभागातील 11 आणि मुंबई विभागातील 7 वाहनांचा समावेश आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, परिस्थितीचा आढावा घेऊन पर्यायी व्यवस्था उभारण्यात आल्या आहेत. वाहतूक सुरळीत होताच बस सेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येईल.

हेही वाचा :

आधावरचा पत्ता नाव किंवा ई-मेल चुकलाय? हे App डाउनलोड करा अन् मिनिटांत चुका करा

अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

‘या’ जन्मतारखेला जन्मलेली लोक प्रचंड नशीबवान असतात; गुरू ग्रहाची असते मोठी

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *