रणबीर कपूर यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘रामायण’ सध्या प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चेचा विषय ठरला आहे.(event)आतापर्यंत या चित्रपटातील कोणत्याही पात्राचा अधिकृत लूक जाहीर करण्यात आलेला नव्हता. मात्र आता निर्मात्यांनी चाहत्यांची प्रतीक्षा संपवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. मार्च महिन्यात होणाऱ्या एका भव्य कार्यक्रमात प्रमुख कलाकारांचे पहिले अधिकृत लूक जाहीर केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ‘रामायण’च्या टीमकडून मार्च महिन्यात पहिला अधिकृत भव्य कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. या सोहळ्यात रणबीर कपूर रामाच्या भूमिकेत कसा दिसणार आहे, याचा पहिला अधिकृत लूक उघड होणार आहे. सुरुवातीला रणबीर कपूरने ही भूमिका करावी की नाही, यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा आणि वाद झाले होते. मात्र चित्रपटाचा टीझर समोर आल्यानंतर, त्यामध्ये दिसलेल्या रणबीरच्या झलकमुळे अनेक प्रेक्षकांनी त्याच्यावर विश्वास व्यक्त केला होता.

या चित्रपटात रामाची भूमिका साकारणाऱ्या रणबीर कपूरच्या (event)अभिनयाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी आणि निर्माता नमित मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली तयार होणारा हा चित्रपट २०२६ मधील सर्वाधिक अपेक्षित प्रोजेक्ट्सपैकी एक मानला जात आहे. या कार्यक्रमासाठी निमंत्रण पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचीही चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहे.हा भव्य कार्यक्रम मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित केला जाणार असून, राम नवमीच्या दिवशी म्हणजेच २७ मार्च रोजी हा सोहळा पार पडणार असल्याचे सांगितले जात आहे. या कार्यक्रमासाठी राज्य आणि केंद्र सरकारमधील अनेक वरिष्ठ नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे हा सोहळा ऐतिहासिक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या कार्यक्रमाला चित्रपटातील प्रमुख कलाकार उपस्थित राहण्याची शक्यता आहे.(event) रणबीर कपूरसोबतच साई पल्लवी, रवि दुबे आणि यश यांचीही उपस्थिती अपेक्षित आहे. ‘रामायण’चा पहिला भाग यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा वाल्मिकींच्या रामायणावर आधारित असून, यश रावणाच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत, सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत आणि रवि दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत झळकणार आहेत.
हेही वाचा :
आधावरचा पत्ता नाव किंवा ई-मेल चुकलाय? हे App डाउनलोड करा अन् मिनिटांत चुका करा
अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
‘या’ जन्मतारखेला जन्मलेली लोक प्रचंड नशीबवान असतात; गुरू ग्रहाची असते मोठी