महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी (employees)दिलासादायक बातमी समोर आली आहे. जानेवारी २०२६ पासून केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांची वाढ निश्चित करण्यात आली आहे. या निर्णयाचा थेट फायदा लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे.ही वाढ अखिल भारतीय ग्राहक निर्देशांकाच्या आधारे ठरवण्यात आली असून, कामगार व रोजगार मंत्रालयाने नुकतीच यासंबंधीची अधिकृत आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता किती वाढणार, याबाबत असलेली अनिश्चितता आता संपुष्टात आली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दर सहा महिन्यांनी, म्हणजे(employees) जानेवारी आणि जुलै महिन्यात, अखिल भारतीय ग्राहक निर्देशांकाच्या सरासरीवर निश्चित केला जातो. जानेवारी २०२६ मधील वाढ ही जुलै ते डिसेंबर २०२५ या कालावधीतील निर्देशांकाच्या सरासरीवर आधारित आहे. कामगार व रोजगार मंत्रालयाने ३० जानेवारी २०२६ रोजी डिसेंबर २०२५ चा ग्राहक निर्देशांक जाहीर केला असून, तो १४८ पूर्णांक दोन इतका नोंदवण्यात आला आहे. या आकडेवारीच्या आधारे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांची वाढ निश्चित झाल्याची माहिती कर्मचारी संघटनांकडून देण्यात आली आहे.
ही वाढ जानेवारी २०२६ पासून लागू होणार असल्यामुळे कर्मचाऱ्यांना मागील (employees)महिन्यांची थकबाकीही मिळण्याची शक्यता आहे. याबाबतचा अधिकृत शासन निर्णय मार्च महिन्यात जाहीर होण्याची शक्यता असून, होळी सणाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून याची घोषणा होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.वाढीव महागाई भत्त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात दिलासा मिळणार असून, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत सकारात्मक ठरणार आहे.
हेही वाचा :
आधावरचा पत्ता नाव किंवा ई-मेल चुकलाय? हे App डाउनलोड करा अन् मिनिटांत चुका करा
अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
‘या’ जन्मतारखेला जन्मलेली लोक प्रचंड नशीबवान असतात; गुरू ग्रहाची असते मोठी