वय वाढल्यावर केस(hair) पांढरे होणे स्वाभाविक आहे. मात्र, आजकाल कमी वयातच केस पांढरे होण्याच्या समस्या वाढताना दिसतात. यामागे अनुवंशिकता, ताणतणाव, प्रदूषण, थायरॉईड विकार, प्रथिनांची कमतरता, अशक्तपणा अशा अनेक कारणांबरोबरच चुकीच्या खाण्याच्या सवयी देखील जबाबदार आहेत. विशेषतः जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने केसांचे आरोग्य बिघडते, असे तज्ज्ञ सांगतात.

गाझियाबादच्या मॅक्स हॉस्पिटलमधील त्वचारोगतज्ज्ञ डॉ. सौम्या सचदेवा यांच्या मते, साखर थेट केस पांढरे करते असे नाही. पण दररोज जास्त प्रमाणात गोड खाल्ल्याने रक्तातील ग्लुकोजची पातळी सतत बदलते. याचा परिणाम केसांच्या मुळांवर आणि मेलेनिनच्या निर्मितीवर होतो. मेलेनिन हेच रंगद्रव्य केस काळे ठेवते. मेलेनिनची निर्मिती घटल्यास केस अकाली पांढरे होऊ लागतात.
याशिवाय, साखरेमुळे शरीरात मुक्त रॅडिकल्स तयार होतात. हे अस्थिर रेणू केसांच्या (hair)मुळांना कमकुवत करतात, ज्यामुळे केस गळतात आणि पांढरे होतात. ताणतणावामुळे लोक गोड पदार्थ अधिक खातात, ज्यामुळे हार्मोन्समध्ये असंतुलन निर्माण होते आणि केस पांढरे होण्याची प्रक्रिया वेगाने घडते.

केस पांढरे होण्यापासून बचावासाठी टिप्स
गोड पदार्थ, मिठाई, सॉफ्ट ड्रिंक्स यांचे सेवन कमी करा.
आहारात फळे, भाज्या, सुका मेवा आणि बिया यांचा समावेश करा.
योग, प्राणायाम आणि ध्यान करून ताण कमी करा.
भरपूर पाणी प्या, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाका.
केसांसाठी आवश्यक पोषक तत्त्वे म्हणजे लोह, व्हिटॅमिन B12 आणि प्रथिनांचा आहारात समावेश करा.केस काळे आणि निरोगी ठेवायचे असतील तर संतुलित आहार घ्या आणि गोड पदार्थ मर्यादित प्रमाणातच खा.
हेही वाचा :
सप्टेंबर महिना या राशींना सौभाग्य मिळवून देणार….
कोल्हापुरात गणेशोत्सवाला महास्वरूप केव्हा आले….?
राहुल गांधींच्या ‘या’ निर्णयामुळे महाआघाडीत पडणार फूट