आपण बाहेर असताना तहान लागली की पटकन पाण्याची बाटली(bottle) विकत घेतो. मात्र, त्या बाटलीच्या झाकणाचा रंग तुम्ही कधी नीट पाहिलाय का? निळा, पांढरा, काळा, पिवळा किंवा हिरवा – प्रत्येक रंगाचा एक खास अर्थ असतो. हा रंग केवळ डिझाइनसाठी नसून बाटलीतील पाण्याचा स्त्रोत आणि गुणवत्ता सांगतो.

झाकणाच्या रंगामागचं रहस्य
निळं झाकण: मिनरल वॉटर, थेट झऱ्यातून घेतलेलं पाणी. आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं.
पांढरं झाकण: आरओ किंवा फिल्टर मशीनद्वारे शुद्ध केलेलं पाणी. पिण्यासाठी सुरक्षित.
काळं झाकण: अल्कलाइन वॉटर, महागडे आणि मिनरल्सयुक्त पाणी. सेलिब्रिटी व खेळाडूंची पसंती.
पिवळं झाकण: इलेक्ट्रोलाइट्स आणि व्हिटॅमिन्स मिसळलेलं पाणी. शरीराला ऊर्जा देण्यासाठी उपयुक्त.
हिरवं झाकण: नैसर्गिक स्त्रोतांमधून थेट शुद्ध केलेलं पाणी.

पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पाण्याची बाटली(bottle) खरेदी कराल, तेव्हा झाकणाच्या रंगावर एक नजर टाका. हा छोटासा तपशील तुम्हाला तुमच्या गरजेनुसार योग्य पाणी निवडण्यास मदत करू शकतो.
हेही वाचा :
मराठा आरक्षणावर प्रश्नचिन्ह! 58 लाख नोंदींचा डाटा सरकारकडे नाही
मराठ्यांचं टेन्शन वाढलं! ‘हा सरसकट जीआर नाही
रस्त्यावर भीक मागतोय हा प्रसिद्ध कलाकार….