तुझ्या शरीरात चार भुतं आहेत, त्यांना काढून टाकण्यासाठी तुला 11 वेळा संभोग करावा लागेल,(demons) असं 17 वर्षाच्या मुलीला एका वासनांध तरूणाने सांगितले. असं न केल्यास तुझा भावी पती मरू शकतो, अशी धमकी देखील दिली. अन् तिच्यासोबत एकाच दिवसांत तब्बल तीन वेळा लैंगिक संबंध ठेवले. अंधश्रद्धेचा हा धक्कादायक प्रकार मुंबईतील विरार येथे घडला आहे.पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तुला मुलं होणार नाही, तुझा पती देखील मरेल, हे कोणाला सांगू नको. तुझ्या शरीरातील दुष्ट आत्म्यांना पळवून लावण्यासाठी 11 वेळा संभोग करावा लागेल, अशी बतावणी केली. आरोपीने त्याच्या या भयंकर कांडात मित्राची देखील मदत घेतली. राजोडी समुद्रकिनाऱ्याजवळील एका लॉजमध्ये खोली बुक केली. तिथे त्याने पीडित तरूणीवर तंत्र-मंत्र करण्याच्या बहाण्याने तीनदा लैंगिक अत्याचार केला. ही धक्कादायक घटना मागील महिन्यात घडली आहे.

पीडितेच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी बीएनएसच्या कलम 137 (2), 64 आणि 64(2) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम 1 आणि 49 आणि महाराष्ट्र मानव बलिदान आणि इतर अमानवी, अशोभनीय आणि भ्रष्ट प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा, 2013 अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. पिडीता विरारमध्ये राहत असून अकरावीत शिकते.(demons) तिला मानसिक आजार असल्याचं सांगितलं जातंय. परंतु कुटुंबाचा दावा आहे की, तिला भूताने पछाडले आहे.

पीडितेच्या एका मैत्रिणीने तिची आरोपीशी ओळख करून दिली होती. जुलै महिन्यात ती आरोपीला पहिल्यांदा भेटली. यावेळी आरोपीने तिला भूत उतरवण्यासाठी अकरा वेळा लैंगिक संबंध ठेवावे लागतील, असं सांगितलं. सुरूवातीला पीडितेने नकार दिला, परंतु नंतर तिला तिच्या भविष्याची भीती घातली गेली.(demons) त्यानंतर ती तयार झाली अन् 30 जुलै रोजी आरोपीला भेटली.घटनेनंतर, पीडितेने तिच्या एका मैत्रिणीला घडलेल्या प्रकाराबद्दल सांगितले. त्यांतर पीडितेच्या मैत्रिणीने तिच्या पालकांशी संपर्क साधला. त्यानंतर ते विरार पोलीस ठाण्यात पोहोचला. तिथे पीडितेने तक्रार दाखल केली. दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत. पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत.
हेही वाचा :
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी बेस्ट वीज विभागाचा सर्वात मोठा निर्णय
एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार! ‘हा’ बडा नेता शिवसेनेत प्रवेश करणार
डे-केअरमध्ये 15 महिन्याच्या मुलीचा गळा दाबणे, तोंडात पेन्सिल घालणे, शरीरावर चावा घेण्याचा घडला भयंकर प्रकार