मुलांच्या सुरक्षिततेबाबत पालकांना विश्वास देणाऱ्या डे-केअरमध्येच एका 15 महिन्याच्या निष्पाप चिमुकलीवर अमानुष मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीचा(girl) गळा दाबणे, तोंडात पेन्सिल घालणे, शरीरावर चावे घेणे, प्लॅस्टिकच्या बेल्टने मारणे आणि वारंवार जमिनीवर आपटणे अशा क्रूर प्रकाराचा उघडकीस आलेला व्हिडिओ पाहून पीडितेच्या आईचा जीव थरारला.

ही घटना 4 ऑगस्ट रोजी नोएडातील एका डे-केअर सेंटरमध्ये घडली. मुलीच्या आईने सांगितले की, तिचे पती सकाळी चिमुकलीला डे-केअरमध्ये सोडून गेले होते. दुपारी साडेबारा वाजता मुलीला(girl) घ्यायला गेल्यावर शिक्षिकांनी तिला ‘बहुतेक चिकनपॉक्स आहे’ असे सांगितले. मात्र मुलीची अवस्था पाहून आईच्या मनात संशय आला आणि तिने तिला त्वरित दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी तपासणीदरम्यान सांगितले की, मुलीसोबत मारहाण झाली आहे.

सीसीटीव्ही फुटेजने उघड केला क्रूर चेहरा :
आईने डे-केअरकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली असता, सुरुवातीला नकार देण्यात आला. त्यानंतर केस करण्यास जात असताना विविध लोकांकडून दबाव टाकून तिला माफीनामा घेऊन विषय मिटवण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र जेव्हा तिने व्हिडिओ पाहिला, तेव्हा त्यातील अमानुष दृश्यांनी ती हादरून गेली.

व्हिडिओमध्ये मुलांची देखरेख करणाऱ्या महिलेने मुलीचा गळा दाबणे, तोंडात पेन्सिल घालणे, भिंतीवर डोके आपटणे, जमिनीवर फेकणे अशा क्रूर कृत्यांची मालिका होती. तब्बल 45 मिनिटे ही अमानुष मारहाण सुरू होती, असा आरोप मुलीच्या आईने केला आहे.

गुन्हा दाखल, दोषींवर कठोर कारवाईची मागणी :
या प्रकरणात पोलिसांनी तक्रार दाखल केली असून, पीडितेच्या आईने फक्त देखरेख करणाऱ्या महिलेवरच(girl) नव्हे, तर डे-केअरच्या मालक चारू अरोरा यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. घटनेमुळे पालकांमध्ये प्रचंड संताप असून, डे-केअर सेंटरच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राज्यात व देशभरात डे-केअरच्या मानकांवर आणि सुरक्षा उपायांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. पालकांच्या विश्वासाला तडा देणाऱ्या अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर नियमावली लागू करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

हेही वाचा :

3 सेकंदांच्या Kissing Scene ने OTT वर धुमाकूळ! 

काँग्रेसला मोठा धक्का! बड्या नेत्याचा राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

भर रस्त्यात पत्नीची पतीला बेदम मारहाण; केस पकडले अन् लगावली कानशिलात, Video Viral

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *