उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना धमकावल्याचा आरोप होत असून, त्यांचा फोनवरील संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात राजकीय खळबळ(political circles) उडाली आहे. विरोधकांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. मात्र, त्यांच्या भावकीतूनच त्यांना साथ मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी काकांच्या समर्थनार्थ पुढे येत, या प्रकरणाला वेगळा रंग दिला जात असल्याचा आरोप केला आहे.

“संभाषणाला मुद्दाम ट्विस्ट दिला” – रोहित पवार :
रोहित पवार यांनी सोशल मीडियावर(political circles) लिहिले की, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा भागात मुरूमाच्या बेकायदेशीर उत्खननावरून झालेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या संभाषणाला जाणीवपूर्वक वेगळा ट्विस्ट देण्यात येत आहे. त्यांनी म्हटलं –

“अजितदादांनी त्यांच्या मित्रांकडून रचल्या जाणाऱ्या सापळ्याकडे लक्ष दिले पाहिजे. महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा व्हायला हवी होती, पण मुद्दाम वाद निर्माण केला जात आहे.”

अजितदादांचा स्वभाव स्पष्टवक्तेपणाचा :
रोहित पवारांनीअजित पवारांच्या स्वभावाबाबत भाष्य करताना म्हटलं की, “अजितदादा स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. ते सामान्यपणे बोलत असले तरी नवीन व्यक्तीला ते रागावल्यासारखे वाटू शकते. पण त्यांची कार्यशैली आणि स्वभाव गेल्या 35-40 वर्षांपासून महाराष्ट्राला परिचित आहे.”

दरम्यान, करमाळा घटनेत संबंधित महिला अधिकाऱ्याचीही चूक नसल्याचे रोहित पवारांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितलं की, “त्यांचा स्वभाव सत्याला सत्य म्हणण्याचा आहे. मात्र मित्रपक्षांनीच हा मुद्दा वेगळ्या पद्धतीने मांडून अजितदादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे.”

विरोधकांचा जोरदार हल्ला :
शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर हल्लाबोल करत, ते “चोरांना संरक्षण देत आहेत” असा आरोप केला. तसेच, सरकारमध्ये राहण्याचा त्यांना अधिकार नाही असेही त्यांनी म्हटले.

अजित पवार एका आयपीएस अधिकाऱ्याला बेकायदेशीर कामांना पाठिंबा देण्यास सांगतात आणि इतरांना कायद्याचे पालन करण्याचा सल्ला देतात, असा आरोप राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला.

हेही वाचा :

टाटा मोटर्सच्या या कंपनीवर सर्वात सायबर अटॅक, सिस्टम केली हॅक

चाहत्यांनी कारला घेरलं, ‘मुंबईचा राजा’ म्हणत जल्लोष केला, रोहित शर्मा सोबत नक्की काय घडलं? Video Viral

लालबाग राजाच्या प्रवेशद्वाराजवर मोठा अपघात, भरधाव वाहनानं दोन चिमुकल्यांना चिरडलं

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *