भारतीय वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा(Rohit Sharma) किती लोकप्रिय आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा मुंबईत आला. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रोहितला पाहण्यासाठी शेकडो चाहत्यांनी जमाव जमवला आणि “मुंबईचा राजा” अशा घोषणा देत परिसर गजबजून टाकला. नक्की रोहितसोबत काय घडलं याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

अलीकडेच 38 वर्षीय रोहित शर्माने मुंबईतील वरळी भागात जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. पण त्यांच्या कारला गर्दीने अक्षरशः वेढा घातला. चाहत्यांचा उत्साह इतका जबरदस्त होता की कार हलवणंसुद्धा कठीण झालं. अखेर रोहित कारच्या सनरूफमधून बाहेर येत हात हलवत चाहत्यांच्या प्रेमाला प्रतिसाद दिला.

मुंबईकरांचा लाडका आणि IPLचा ‘हिटमॅन’
गेल्या दशकभराहून अधिक काळ भारतीय क्रिकेटमध्ये रोहितचं योगदान अनमोल राहिलं आहे. मुंबईसाठी घरगुती क्रिकेट खेळणं असो किंवा मुंबई इंडियन्सला तब्बल पाच IPL किताब जिंकवून दिला. त्यामुळे रोहित (Rohit Sharma)मुंबईकरांसाठी फक्त क्रिकेटर नाही तर एक भावना बनला आहे.

सरफराज खानचा अनोखा सलाम
दरम्यान, मुंबईचा आणखी एक तारा खेळाडू सरफराज खानने सोशल मीडियावर रोहितला अनोख्या पद्धतीने आदरांजली दिली. त्याने चाहत्यांनी बनवलेला एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये रोहितच्या भन्नाट फलंदाजीचे क्षण दाखवले होते. त्यासोबत त्याने चार हृदयाचे इमोजी पोस्ट करत आपला आदर व्यक्त केला. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे सरफराजने २०२४ मध्ये इंग्लंडविरुद्ध टेस्ट पदार्पण रोहितच्या कर्णधारकीतच केलं होतं.

लवकरच टीम इंडियामध्ये पुनरागमन
IPL 2025 नंतर रोहित मैदानाबाहेर असला तरी लवकरच तो परतणार आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे मालिकेत तो पुन्हा टीम इंडियासाठी खेळताना दिसेल, अशी अपेक्षा आहे. याआधी बीसीसीआयच्या नव्या ब्रॉन्को फिटनेस टेस्टमध्ये रोहितने उत्तीर्ण होत चर्चेतही झळकला होता.

हेही वाचा :

पर्यटकांची बस थेट १००० फूट खोल दरीत कोसळली; १५ ठार

शिल्पा आणि राज कुंद्राच्या वाढल्या अडचणी पोलिसांनी बजावले…

तब्येत बिघडल्याच्या बहाण्याने हॉटेलवर नेलं नंतर….

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *