देशभरात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, दिल्ली या राज्यात पुरस्थिती निर्माण झाला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये भीषण पुरस्थिती निर्माण झाली आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सक्रिय झाले आहेत. लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी पूरग्रस्त(flood) राज्यांचा दौरा करणार आहेत.

उत्तर भारतातील अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे अनेक भागात पुरस्थिती(flood) निर्माण झाली आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. एनडीआरएफ, स्थानिक प्रशासन बचाव कार्य करत आहे. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुरबाधित राज्यांचा दौरा करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याआधी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पंजाब राज्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी केली. पुरामुळे प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मदतीचे आश्वासन दिले आहे. आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीच पूरग्रस्त राज्यांचा दौरा करणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे बचाव कार्यात वेग येण्यास फायदा होणार आहे.
पंजाब राज्यात जोरदार पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पुर आला आहे. महापुरामुळे अनेकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. 1900 पेक्षा जास्त गावे पाण्याखाली गेली आहेत. 23 जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. 3 लाखांपेक्षा जास्त नागरिक प्रभावित झाले आहेत. दीड लाख हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. 20 हजार पेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
हेही वाचा :
टाटा मोटर्सच्या या कंपनीवर सर्वात सायबर अटॅक, सिस्टम केली हॅक
चाहत्यांनी कारला घेरलं, ‘मुंबईचा राजा’ म्हणत जल्लोष केला, रोहित शर्मा सोबत नक्की काय घडलं? Video Viral
लालबाग राजाच्या प्रवेशद्वाराजवर मोठा अपघात, भरधाव वाहनानं दोन चिमुकल्यांना चिरडलं