अकोल्यातील अंबाशीमध्ये नातेवाईकांनी जावयाची हत्या(murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी 2 महिला व एका युवकाला अटक करण्यात आली आहे.

नातेवाईकांनी जावईची हत्या(murder) केल्याची घटना अकोला जिल्ह्यातील अंबाशी येथे घडली आहे. नागेश गोपनारायण असं मयत तरुणाचे नाव आहे. गेल्या सहा महिन्यांपासून नागेश आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद सुरू असल्याने पत्नी नागेशपासून वेगळी राहत होती. त्यावरुनच नागेश संतप्त झाला होता. यावरुन सासऱ्याच्या मंडळींवर त्याचा राग होता.
नागेश पत्नीला आणायला घरी गेला असता यावेळी नागेशने त्याची पत्नी कुठे आहे, असं विचारत त्याने मोठी आणि लहान मेहुणीला मारहाण सुरू केली. हे पाहून मोठ्या मेहुणीचा मुलगा पुढे आला व त्याने त्या ठिकाणी जवळच पडलेल्या लाकडाने व तीक्ष्ण हत्याराने मयत नागेशच्या डोक्यावर आणि पाठीवर वार केला. या मारहाणीत नागेशचा घरासमोरील रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडुन जागीच मृत्यू झाला.
पातुर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारावर अवघ्या एका तासातच आरोपींचा शोध लावत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत याप्रकरणी पोलिसांनी दोन महिला आणि एका युवकाला अटक केली असून पुढील तपास करीत आहे.
दूध का सांडलं या किरकोळ कारणातून एका पतीने आपल्या पत्नीचा काटा काढल्याची घटना परभणीच्या पूर्णा तालुक्यातील बलसा या गावात घडली आहे. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. पत्नी सुनीताबाई शिंदे यांच्याकडून चुकून दूध सांडलं गेलं. यावरून पती देविदास शिंदे यांनी त्यांना मारहाण केली यावेळी सुनीताबाई पतीला रागात बोलून शेती निघून गेल्या.
पत्नी आपल्याला उलट कशी बोलू शकते, या भावनेने देविदास शिंदे यांचा तिळपापड झाला. पती ही पत्नीच्या पाठीमागे शेतात गेल्या तिथे ही त्यांनी पत्नी सुनीताबाईला मारहाण केली. सोबत असलेल्या रुमालाने त्यांचा गळा आवळून जीवे ठार मारले.
हेही वाचा :
तुम्ही पाहिला का? सलमान कुनिकाचा बोल्ड डान्स…Video Viral
सरकारचं टेन्शन वाढलं! ओबीसींचा महामोर्चा ‘या’ तारखेला मुंबईत धडकणार
एका कुटुंबाची शोकांतिका! ना खंत, ना खेद कुणाला..!