इचलकरंजीजवळील रांगोळी येथे घडलेल्या निर्घृण हत्येने परिसर हादरला असून, (injured)जयसिंगपूरमधील जिम ट्रेनरच्या खुनाची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हातकणंगले तालुक्यातील रांगोळी येथील काळम्मावाडी वसाहतीजवळील माळरानावर गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास शुभम कुमार सादळे (वय २७) या तरुणावर दुचाकीवरून पाठलाग करत दोघा-तिघा हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. पोटात खोलवर वार झाल्याने गंभीर जखमी झालेल्या शुभमने मदतीसाठी घराकडे धाव घेत भावाला हाक मारली; मात्र काही अंतरावरच तो कोसळला. नातेवाईकांनी तातडीने त्याला इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.

शुभम हा स्थानिक दुचाकी सर्व्हिसिंग सेंटर चालवत होता. गावात यात्रा सुरू (injured) असल्याने त्याने दुकान बंद करून मित्रांसोबत फेरफटका मारला होता. स्मशानभूमीजवळ मित्राला सोडून तो मोबाईलवर बोलत काळम्मावाडी वसाहतीकडे निघाला असतानाच पाठीमागून आलेल्या हल्लेखोरांनी अचानक वार केले. आरडाओरडा झाल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले.

माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. (injured) तपासात हल्लेखोराचा गॉगल आणि शस्त्राचे प्लास्टिक आवरण सापडले असून, गावातील मुख्य चौकातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुचाकीवर मधोमध बसलेल्या व्यक्तीच्या हातात धारदार हत्यार दिसत आहे. काही नागरिकांनीही चौकातून काळम्मावाडी वसाहतीकडे जाणाऱ्या तिघांना पाहिल्याचे सांगितले आहे. प्राथमिक तपासात माळरानावरूनच शुभमचा पाठलाग करत घराच्या दिशेने हल्ला झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यानुसार काही संशयितांची नावे समोर आली असून, त्यांचा शोध वेगाने सुरू आहे.

पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल (injured)करण्याची प्रक्रिया सुरू होती. हुपरी पोलिसांकडूनही समांतर तपास केला जात आहे. या हत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, वैयक्तिक वैमनस्य किंवा स्थानिक राजकीय वादाची शक्यता तपासली जात आहे. कुटुंबातील एकमेव कर्ता मुलगा गमावल्याने सादळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावकऱ्यांनी एकत्र येत हल्लेखोरांना तातडीने अटक करण्याची मागणी केली असून, पोलिसांना सहकार्याचे आश्वासन दिले आहे. या घटनेमुळे रांगोळी–इचलकरंजी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा :

तर सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री? मोठं भाकित समोर!

स्वप्नात वारंवार मृतदेह दिसणे म्हणजे मोठ्या संकटाची चाहूल, अजिबात करू नका दुर्लक्ष अन्यथा…

कोहलीवर हल्ला? आर अश्विनने तात्काळ विराटला लावला फोन, काय आहे प्रकरण?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *