नांदणी (ता. शिरोळ) येथील महादेवी हत्तीणीला नांदणी मठाकडे पाठविण्याबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा(court) आदेश मंगळवारी (ता. १६) राज्य सरकारला प्राप्त झाला. त्यानंतर बुधवारी (ता. १७) कोल्हापूर येथे नांदणी मठाचे महास्वामी यांनी अर्जावर स्वाक्षऱ्या केल्या असून गुरुवारी (ता. १८) उच्चस्तरीय समितीकडे नांदणी मठ, राज्य शासन आणि वनताराकडून एकत्रित अर्ज दाखल होणार आहे. ही माहिती सर्वोच्च न्यायालयाचे अॅड. मनोज पाटील यांनी दिली.

गेल्या शुक्रवारी न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली होती. राज्य सरकारच्या वकिलांनी यावेळी स्पष्ट केले की, सर्वोच्च न्यायालयाच्या(court) आदेशानुसार हत्तीणीला वनतारा येथे पाठवण्यात आले होते. मात्र, कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नांदणी मठाशी समन्वय साधून तेथेच अद्ययावत हत्ती पुनर्वसन केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
सुनावणीवेळी ‘पेटा’च्या वकिलांनी हत्तीणीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगून नांदणी मठात कोणत्याही सुविधा नसल्याचे प्रतिपादन केले. त्यावर सर्वोच्च न्यायालयानेही उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे हत्तीणीची तब्येत खालावलेली असल्याचे नमूद केले. मात्र, वनताराच्या वकिलांनी तातडीने नांदणी येथे आवश्यक सुविधा उभारून उच्चस्तरीय समितीच्या देखरेखेखाली हत्तीणीची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन न्यायालयाला दिले.
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश मिळाल्यानंतर आता नांदणी मठाकडून सर्व कागदपत्रे तयार करून ती उच्चस्तरीय समितीकडे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे महाराष्ट्रासह कर्नाटक सीमाभागाचे लक्ष या घडामोडींवर केंद्रित झाले आहे
हेही वाचा :
कुरळे केसांना सांभाळणे जातेय कठीण?
सावधान! या भाज्या कधीही फ्रिजमध्ये ठेवू नका;
पावसाळ्यात पिठात किडे होण्यामुळे वैतागला आहात?