नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातून एक जादूटोण्याचा प्रकार समोर आला आहे. चोरीच्या संशयावरून दोघांना मंतरलेला नागोळीच्या पानाचा विडा(Vida) थंड पाण्यात बुडवून त्यात तांदूळ टाकून खाऊ घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातून एक जादूटोण्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. चोरीच्या संशयावरून दोघांना मंतरलेला नागोळीच्या पानाचा विडा थंड पाण्यात बुडवून त्यात तांदूळ टाकून खाऊ घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

हा विडा खाल्यानंतर शरीराला आणि मनाला वेदना झाल्याचं पीडित व्यक्तीने सांगितले आहे.या अघोरी प्रकारचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे(Vida). या प्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात चौघांविरोधात जादूटोना प्रतिबंध कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाप लेकासह जादू टोना करणाऱ्या भोंदूबाबाचा देखील समावेश आहे.रामा आरोटे यांनी ११ ऑगस्ट रोजी भोंदू बाबांनी दिलेले पानाचे विडे गावातील परमेश्वर कंठीराम राठोड यांना व आणखी एका व्यक्तीला दिले. यावेळी विडा खाल्याने परमेश्वर यांच्या शरीराला व मनाला वेदना झाल्या. विडा खाऊ घातल्याचा व्हिडीओ एकाने आपल्या मोबाईल मध्ये कैद केला आहे.

परमेश्वर कांतिराम राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामतीर्थ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी जादूटोणा प्रतिबंधक कायदा प्रमाणे मांत्रीक गंगाराम संका कादरी यांच्यासह रामा नारायण आरोटे (वय 55), गंगाधर रामा आरोटे (वय 30), राजू नारायण आरोटे (वय 40 राहणार केरूर) या चौघा जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार काळे हे पुढील तपास करीत आहे. या घटनेने बिलोली तालुक्यात खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गालगतच्या सातिवली गावातील पाटील पाड्याच्या स्मशानभूमी परिसरातील ओहोळा लगतच्या खडकावर अघोरी कृत्य आणि पूजा सुरू असल्याचं स्थानिक शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले होते. याबाबतची माहिती शेतकऱ्यांनी ग्रामस्थांना दिल्यानंतर सरपंच, उपसरपंच, तंटा मुक्ती अध्यक्ष, महिला आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पूजास्थळी ग्रामस्थ येत असल्याची कुणकुण लागताच अघोरी पूजा करणाऱ्या आणि पुजाऱ्याने घटनास्थळावरून पळ काढला. ग्रामस्थांनी अघोरी पूजेबाबत जाब विचारला असता पूजेत सहभागी असलेल्याने ग्रामस्थांसोबत हुज्जत घालत अरेरावीची करत घटनास्थळावर निघून गेला.
घटनास्थळी अघोरी पूजे आणि जादू टोण्यासाठी पिठाची बाहुली, लिंबू,चाकू, पांढरी टोपी, बिडी – सिगरेट, कोंबड्याची पिसे, अबीर, गुलाल आणि अगरबत्ती आदी साहित्य आढळून आले आहे.याप्रकरणी ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती देऊन सुद्धा पोलीस घटनास्थळी फिरकले नाही त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.अघोरी पूजा आणि जादू टोण्याच्या प्रकारामुळे गावातील वातावरण बिघडण्याची शक्यता असून पूजा घालणाऱ्या विरोधात पोलिसांना कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. त्यामुळे पोलीस आता नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
फक्त 4 दिवसांत ST ची 137 कोटींची कमाई, यशामागचं रहस्य उलगडलं”
स्वातंत्र्य दिन व संवत्सरी निमित्त महापालिकेचा निर्णय १५ व २७ ऑगस्ट
रक्षाबंधन निमित्त प्रवासी वाहतुकीतून एसटीला १३७ कोटी रुपयांचे उत्पन्न