राजधानी दिल्लीमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.(incident)दिल्लीतील नरेला भागात ही घटना घडली. दोन्ही मुलींना आरोपींनी एका खोलीमध्ये डांबून ठेवत त्यांच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकल्या.

पीडित मुलीच्या आईने सांगितले की, माझी ९ वर्षांची मुलगी नरेला येथे एका स्विमिंग पूलमध्ये पोहण्याची प्रॅक्टिस करण्यासाठी जात होती. (incident)५ ऑगस्टला ती नेहमीप्रमाणे स्विमिंग करण्यासाठी गेली. त्याठिकाणी आरोपी अनिल आधीच उपस्थित होता. अनिल माझ्या मुलीला एका खोलीमध्ये घेऊन गेला. त्याठिकाणी आणखी एक १२ वर्षांची मुलगी होती. ती मुलगी देखील याठिकाणी स्विमिंग शिकण्यासाठी येत होती. आरोपीने दोन्ही मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर त्याठिकाणी दुसरा आरोपी मुनील आला. त्याने देखील दोन्ही मुलींवर बलात्कार केला.

सामूहिक बलात्कार केल्यानंतर आरोपींनी दोन्ही मुलींना घटनेबाबत कुणाला सांगितले तर तुम्हाला जीवे मारून टाकू अशी धमकी दिली. आरोपींनी धमकी दिल्यामुळे मुली प्रचंड घाबरल्या होत्या. त्यामुळे त्यांनी या घटनेबाबत कुटुंबीयांना देखील काहीच सांगितले नाही. ९ वर्षांची पीडित मुलगी स्विमिंगसाठी जायला नकार देत होती. तिची आई तिला सतत स्विमिंगला जा असे सांगत होती पण ती जायला नाही बोलत होती. (incident)त्यामुळे तिच्या आईने तिची विचारपूस केली असता रडत रडत मुलीने तिच्यासोबत घडलेली घटना सांगितली. त्यानंतर तिच्या आईने पोलिसांना फोन करून घरी बोलावून घेतलं.
पोलिसांनी दोन्ही मुलींची वैद्यकिय तपासणी केली असता त्यांच्यावर गँगरेप झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गँगरेप, धमकी देणे आणि डांबून ठेवल्याप्रकरणी तसंच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींचे वय ३७ आणि २४ वर्षे आहे. पोलिस सध्या याप्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपींनी आणखी कोणत्या मुलींसोबत असं कृत्य केले की नाही याचा देखील तपास करत आहेत.
हेही वाचा :
नवीन आयकर विधेयकात काय काय बदललं? ७ नियमांमध्ये झाला मोठा बदल
अंगात 4 भुतं, 11 वेळा संभोग कर, अन्यथा नवरा मरेल अंध तरुणांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
उद्यापासून सुरू होतोय फ्लिपकार्टचा Independence Day Sale; खरेदीवर मिळणार 50% पर्यंत बंपर डिस्काउंट