इचलकरंजी शहरात पोलिसांसमोरच गुंडावर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली. भरवस्तीत झालेल्या या हल्ल्यात सांगलीतील युवक जखमी असून हल्लेखोर फरार झाले आहेत.

अपर पोलिस अधीक्षक कार्यालयातून पोलिसांसोबत बाहेर पडलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारावर आज भररस्त्यात रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडण्यात आली. गोळी उजव्या बरगडीत खोलवर घुसल्याने तो गंभीर जखमी झाला. (the police) या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. ओंकार जितेंद्र कांबळे (वय २२, रा. समता चौक, सांगलीवाडी, जि. सांगली) असे जखमीचे नाव आहे. प्रकृती चिंताजनक बनल्याने त्याला कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

हा प्रकार रात्री साडेसातच्या सुमारास सांगली रोडवरील बादशहा पेट्रोल पंपाजवळ घडला. संशयित हल्लेखोर अनुराग सूर्यवंशी (रा. इचलकरंजी) याच्यासह अन्य साथीदारांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. शहरात गोळी झाडून हल्ला झाल्याचा प्रकार प्रथमच घडल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. तपासादरम्यान सांगली रोड काही काळ वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. रात्री उशिरा पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना तपासाबाबत सूचना दिल्या.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी काही महिन्यांपूर्वी ओंकार कांबळे आणि संशयित अनुराग सूर्यवंशी यांच्यात प्रेम प्रकरणातून वाद निर्माण झाला होता. या वादातून मारहाण झाली होती. (the police) याप्रकरणी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. ओंकार कांबळे व त्याच्या साथीदारांना अटकही करण्यात आली होती. नंतर ते जामिनावर बाहेर आले होते. या पार्श्वभूमीवर आज प्रतिबंधात्मक कारवाईसाठी ओंकार याला येथील अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालयात बोलावण्यात आले होते.

दरम्यान, कार्यालयाबाहेर अनुराग सूर्यवंशी व त्याचे काही साथीदार हल्ल्याच्या तयारीत असल्याची माहिती ओंकार याने पोलिसांना दिली होती. जयसिंगपूर पोलिस ठाण्याकडील पोलिस जगदीश पाटील यांना ओंकारसोबत जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. (the police) दुपारच्या सुमारास ओंकार पोलिसपाटील यांच्यासोबत दुचाकीवरून कार्यालयातून बाहेर पडला. ओंकार दुचाकी चालवत होता, तर पोलिस कर्मचारी पाठीमागे बसला होता. सांगली रोडवरील बादशाह पेट्रोल पंपाजवळील एका पशुखाद्य दुकानासमोर ते पोहोचले असता मागून दुचाकीवर आलेल्या अनुराग सूर्यवंशीने अचानक जवळ येत रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली. गोळी ओंकारच्या उजव्या बाजूच्या बरगडीत घुसली. अचानक झालेल्या गोळीबारामुळे ओंकार आणि पोलिसपाटील दोघेही दुचाकीसह खाली कोसळले.

हेही वाचा :

स्त्रीच्या ‘या’ अवयवाला चुकूनही स्पर्श करू नका, अन्यथा पश्चातापाची येईल वेळ

राष्ट्रवादीच्या 20 हून अधिक आमदारांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट, चर्चा काय? सीएमचीही भेट घेणार; काय घडतयं ?

कानाची काळजी कशी घ्यावी? या चुकांमुळे येऊ शकतो बहिरेपणा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *