परिवहनमंत्री आणि एमएसआरटीसीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी प्रवाशांच्या विश्वासाबद्दल त्यांचे आभार मानतानाच एसटी कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं आहे.राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने (Corporation)गेल्या विकेण्डला चार दिवसांमध्ये सव्वाशे कोटींहून अधिकची कमाई केली आहे. प्रवासी तिकिटांच्या माध्यमातून एसटी महामंडळाने चार दिवसांमध्ये 137.37 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. दिनांक 8 ते 11 ऑगस्ट या कालावधीमध्ये एसटी महामंडळाने ही कमाई केली आहे.

यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे प्रवासासाठी प्रवाशांनी एसटीला पसंती दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे दि. 11 ऑगस्ट या एका दिवशी तब्बल 39 कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळाले. यंदाच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न असल्याची, अशी माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.एसटीला दरवर्षी रक्षाबंधन आणि भाऊबीज (दिवाळी) या दोन दिवसांत विक्रमी उत्पन्न मिळत असते. यंदा रक्षाबंधन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी अनेकांनी प्रवासाचे साधन म्हणून एसटीला पसंती दिली.

यामुळे रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 30.06 कोटी रुपये, रक्षाबंधन दिवशी म्हणजे शनिवारी 34.86 कोटी व दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 33.36 कोटी रुपये, तर सोमवारी तब्बल 39.9 कोटी इतके विक्रमी उत्पन्न एसटीला मिळाले.या चार दिवसांत 1 कोटी 93 लाख प्रवाशांनी एसटीतून प्रवास केला असून, त्यात 88 लाख इतक्या महिला प्रवासी असल्याचे सरनाईक यांनी सांगितले(Corporation). परिवहन माहमंडळाचे 15,000 बसचे जाळे महाराष्ट्रभर दररोज सुमारे 60 लाख प्रवाशांना सेवा देते.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) 8 ते 11 ऑगस्ट 2025 या चार दिवसांत प्रवासी तिकिटांमधून 137.37 कोटी रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवले.11 ऑगस्ट 2025 रोजी MSRTC ला एका दिवसात 39.09 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले, जे या आर्थिक वर्षातील सर्वाधिक एकदिवसीय उत्पन्न आहे.

प्रत्येक दिवसाचे उत्पन्न किती होते?

8 ऑगस्ट: 30.06 कोटी रुपये
9 ऑगस्ट (रक्षाबंधन): 34.86 कोटी रुपये
10 ऑगस्ट: 33.36 कोटी रुपये
11 ऑगस्ट: 39.09 कोटी रुपये

रक्षाबंधन आणि भाऊबीज (दिवाळी) या सणांदरम्यान भावंडे एकमेकांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येने प्रवास करतात, ज्यामुळे MSRTC च्या बसला प्रचंड मागणी असते आणि उत्पन्नात वाढ होते. परिवहनमंत्री आणि एमएसआरटीसीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी प्रवाशांच्या विश्वासाबद्दल आणि सणासुदीदरम्यान आपल्या कुटुंबापासून दूर राहून अथक परिश्रम घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समर्पणाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी पुढील सणांच्या कालावधीत सेवा सुधारण्यावर भर देण्याचे संकेत दिले आहेत, ज्यामुळे प्रवाशांचा अनुभव आणखी चांगला होईल.

हेही वाचा :

नवीन आयकर विधेयकात काय काय बदललं? ७ नियमांमध्ये झाला मोठा बदल
अंगात 4 भुतं, 11 वेळा संभोग कर, अन्यथा नवरा मरेल अंध तरुणांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
उद्यापासून सुरू होतोय फ्लिपकार्टचा Independence Day Sale; खरेदीवर मिळणार 50% पर्यंत बंपर डिस्काउंट

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *