दिल्ली – राजधानीतील एका प्रसिद्ध व्यवस्थापन संस्थेतील महिला विद्यार्थिनींवर कथित धर्मगुरू चैतन्यनंद सरस्वती उर्फ पार्थ सारथी यांच्याकडून लैंगिक छळ केल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. पोलिसांच्या तपासात असे दिसून आले आहे की पार्थ सारथी विद्यार्थिनींशी अश्लील मेसेज पाठवत, रात्री उशिरा भेटींसाठी आमंत्रित करत आणि अपयशी ठरविण्याची धमकी देत होता.दिल्ली पोलिसांच्या एफआयआरनुसार, चैतन्यनंदने व्हॉट्सअॅपवर अश्लील संदेश पाठवले, विद्यार्थिनींना परदेशात नेण्याचे आमिष दाखवले आणि जर त्यांनी त्याचे विरोध केले तर परीक्षेतील गुण कमी करून करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली. पोलिसांनी पार्थ सारथीसोबत असलेली अनेक चॅट्स आणि विद्यार्थिनींचे जबाब गोळा केले आहेत(crime).

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात संस्थेच्या तीन महिला वॉर्डनही सहभागी असल्याचे आढळले. वॉर्डननी मुलींना गप्प राहण्यास भाग पाडले, त्यांच्या मोबाईलवरून चॅट्स डिलीट केल्या आणि तक्रार केल्यास वसतिगृहातून काढून टाकण्याची धमकी दिली. पोलिसांनी तिन्ही वॉर्डनचे जबाब नोंदवले आहेत आणि त्यांच्या भूमिकेची चौकशी करत आहेत.तपासादरम्यान असे दिसून आले की, संस्थेचे सीसीटीव्ही फुटेज आणि विद्यार्थ्यांचे मोबाइल फोनही डिलीट किंवा नुकसान पोहोचवण्याचा कट रचला गेला होता. सध्या ही सामग्री फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली असून, डिलीट केलेला डेटा परत मिळाल्यानंतर केस आणखी मजबूत होईल असे पोलिसांचे म्हणणे आहे.

चैतन्यनंद सध्या फरार आहे आणि दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान व उत्तराखंडमध्ये त्याचा शोध सुरु आहे. पोलिसांना संशय आहे की तो परदेशात पळून जाण्याचा विचार करत होता. त्याला अटक करण्यासाठी लुक आउट सर्क्युलर (एलओसी) जारी करण्यात आले आहे.तपासात असेही समोर आले आहे की, बाबांकडे डिप्लोमॅटिक नंबर प्लेट असलेली कार होती आणि जमीन-मालमत्तेशी संबंधित फसवणुकीमध्ये त्याचा सहभाग होता. पोलिस त्याच्या आर्थिक आणि सामाजिक नेटवर्कचा अभ्यास करत आहेत, तसेच लवकरात लवकर त्याला अटक करून न्याय मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत(crime).

सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, पोलिस आणि मठ प्रशासन एकत्रितपणे विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराबाबत सर्वकाही उघड करण्याचा प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा :

राजघराण्याची सून झाली असती माधुरी दीक्षित; पण एक गैरसमज अन्…

दीपिका पदूकोण करणार या हॉलीवूड अभिनेत्यासोबत रोमान्स?

नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर ५ महिने सामूहिक बलात्कार, ‘त्या’ व्हिडीओमुळे 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *