ठाणे जिल्ह्यातील कल्याण भागात घडलेल्या नर्सिंगच्या(Nursing) १७ वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचार प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीमुळे सुरू झालेल्या या प्रकरणात तब्बल सात जणांनी सुमारे पाच महिन्यांपासून पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे.

पीडितेच्या संमतीशिवाय आरोपींपैकी एका युवकाने तिच्यासोबतचे खासगी क्षणांचे व्हिडिओ काढून आपल्या मित्रांसोबत शेअर केले. त्यानंतर हे व्हिडिओ गटामध्ये फिरू लागले आणि आरोपींनी पीडितेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली(Nursing). धमकावून व मानसिक छळ करून सतत संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे.पीडितेचे कुटुंबीयांना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. वैद्यकीय तपासणीत पीडिता गर्भवती असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रकरण अधिक गंभीर बनले.

पोलिसांनी सर्व सात आरोपींना अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध पोक्सो कायद्यासह बलात्कार व गुन्हेगारी धमकीचे गुन्हे दाखल केले आहेत. न्यायालयात हजर केले असता, त्यांच्या मोबाईल व गाड्या जप्त करण्याचे आदेश देण्यात आले असून न्यायालयाने सर्व आरोपींना ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहदरम्यान, आरोपींच्या वकिलांनी पीडितेच्या वयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून सखोल चौकशीची मागणी केली आहे. सध्या पोलीस पथक या प्रकरणाचा तपास करत असून पुढील न्यायालयीन कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी…..
तरुणाची हुल्लडबाजी; मालवाहू ट्रकमागे केलं असं काही…. Video Viral
ग्राहकांना दिलासा, आज सोनं झालं स्वस्त