भारतात ऑक्टोबर हा सण-उत्सवांचा महिना आहे. यंदाच्या 2025 च्या ऑक्टोबरमध्ये (holidays)नवरात्र ते दसरा, दिवाळी, भाऊबीज आणि छठ पूजा असे अनेक सण आहेत. त्यामुळे बँकांना लांबलचक सुट्ट्या मिळणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयच्या गाईडलाईननुसार, वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्थानिक सणांमुळे बँका बंद राहतील. जर तुम्हाला ऑक्टोबरमध्ये बँकेचे कोणते महत्वाचे काम करायचे असेल, तर सुट्ट्यांची ही यादी आधीच तपासून घ्या.

31 पैकी 21 दिवस बँक हॉलीडे
या महिन्यात देशभरात 15 पेक्षा जास्त दिवस बँका बंद राहतील. प्रत्येक राज्यात सुट्ट्या वेगळ्या असतील, स्थानिक सणांमुळे काही ठिकाणी अतिरिक्त सुट्ट्या मिळतील. याशिवाय, 6 दिवस साप्ताहिक सुट्टी (शनिवार-रविवार) आहेत, ज्यामुळे एकूण 31 पैकी 21 दिवस बँका बंद राहतील.
सण-उत्सवांमुळे सुट्ट्या
1 ऑक्टोबरला नवरात्र, दसरा, आयुध पूजा; २ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती राष्ट्रीय सुट्टी; 3-4 ऑक्टोबरला दसरा-दुर्गा पूजा; 6 ऑक्टोबरला लक्ष्मी पूजा; 7 ऑक्टोबरला वाल्मीकि जयंती; 10 ऑक्टोबरला करवा चौथ; 18 ऑक्टोबरला काति बिहू असम; 20-22 ऑक्टोबरला दिवाळी नरक चतुर्दशी, अमावस्या, बली प्रतिपदा; 23 ऑक्टोबरला भाई दूज; 27-28 ऑक्टोबरला छठ पूजा; 31 ऑक्टोबरला सरदार पटेल जयंती असल्याने बॅंका बंद राहतील.
साप्ताहिक सुट्ट्यांची भर
5,12,19,26 ऑक्टोबर रविवार आणि 11, 25 ऑक्टोबर शनिवार सुट्टी आहेत. या दिवशी बँका बंद राहतील.
राज्यानुसार बदलतात सुट्ट्या
आरबीआयच्या सूचनेनुसार, सुट्ट्या राज्यानुसार बदलतात. (holidays)आरबीआयच्या वेबसाइटवर राज्यवार संपूर्ण यादी उपलब्ध आहे. सणांच्या काळात एटीएममध्ये रोख रक्कम कमी पडू शकते, त्यामुळे डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देण्याचे आवाहन आरबीआयने ग्राहकांना केलंय.

ऑनलाइन सेवा सुरू
बँका बंद असल्या तरी ऑनलाइन बँकिंगद्वारे सर्व कामे करता येणार आहेत. (holidays)आजकाल बँकेच्या बहुतांश सेवा घरबसल्या उपलब्ध आहेत, ज्यामुळे सुट्टीतही कोणतीही अडचण येणार नाही. अतिमहत्वाची कामे असतील तर ऑक्टोबर सुरु होण्याआधी उरकून घ्या.
हेही वाचा :
वर्दीतल्या सैतानाचं हादरवणारं कृत्य!
PhonePe, GPay आणि Paytm वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी
YouTube वर आले जबरदस्त AI फीचर