भारतावर(India) दबाव आणण्यासाठी अमेरिकेने शेजारी देशांशी संबंध दृढ करण्याचा प्रयत्न सुरू केला असून त्यातून दक्षिण आशियात नवे राजनैतिक समीकरण तयार होताना दिसत आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख दुसऱ्यांदा अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले असून त्यांनी काश्मीरच्या मुद्यावर मध्यस्थी करण्याची मागणी केली आहे. मात्र भारताने स्पष्टपणे सांगितले की हा मुद्दा द्विपक्षीय असून कोणत्याही तृतीय पक्षाचा हस्तक्षेप मान्य नाही. दरम्यान, रशियाकडून स्वस्त दरात तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लावला, तर पाकिस्तान, चीन, श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यावर अशी कोणतीही कारवाई केलेली नाही.

या घडामोडींमध्ये आता बांगलादेशही अमेरिकेकडे झुकताना दिसत आहे. तिथल्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार आणि नोबेल पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस हे अमेरिकेच्या दौऱ्यावर असून त्यांनी थेट भारतावर निशाणा साधला आहे. त्यांनी मुलाखतीदरम्यान म्हटले की, बांगलादेशला भारतासोबत (India)अनेक समस्या आहेत. युनूस यांनी माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे नाव घेत सांगितले की, सत्तापालटाच्या वेळी त्या भारतात आश्रयाला गेल्या आणि याच कारणामुळे अनेक तरुणांचे जीव गेले. त्यांच्या उपस्थितीमुळे देशात अस्थिरता वाढली आहे, असा आरोप त्यांनी केला.
युनूस यांनी इस्लामी आंदोलनाबाबत चुकीचा प्रचार केल्याचा आरोप भारतावर ठेवत, “भारत बांगलादेशच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये हस्तक्षेप करत आहे,” असे सूचित केले. पाकिस्तानसोबत झालेल्या महत्वाच्या बैठकीनंतर युनूस यांचे हे भारतविरोधी विधान अधिकच गाजत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर आधीच भारत-पाकिस्तान संबंध तणावपूर्ण झालेले असताना आता बांगलादेशकडून आलेल्या या विधानामुळे नवे राजनैतिक आव्हान उभे राहिले आहे. आता भारत सरकार यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
वर्दीतल्या सैतानाचं हादरवणारं कृत्य!
PhonePe, GPay आणि Paytm वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी
YouTube वर आले जबरदस्त AI फीचर