शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या ज्योती वाघमारे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी (slapped)चांगलेच झापल्याची घटना समोर आली आहे. ज्योती वाघमारे सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी गेल्या आणि त्याठिकाणी त्या शिंदे गटाकडून अन्नधान्याचे किटचे देखील वाटप करत आहेत. यावेळी त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना तुमचं राजकारण नंतर करा असे उत्तर दिलं. आता वेळ आली आहे पूरग्रस्त लोकांना उभं राहून मदत करण्याची असे खडेबोल जिल्हाधिकाऱ्यांनी ज्योती वाघमारे यांना सुनावले. याचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर शहर आणि जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. सिना नदीला महापूर आल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल. शेतकऱ्यांना आणि खेड्यातील नागरिकांना सर्वस्तरातून मदत करण्याच्या कार्याला अगोदर प्राध्यान्य दिले जात आहे. शिवसेना शिंदें गटाच्या (slapped)प्रवक्त्या ज्योती वाघमारे आणि त्यांच्या पक्षातील प्रमुख नेते सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यात जाऊन खेड्या पाड्यातील लोकांना अन्नधान्याचे किट वाटप करत आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी या गावात जाऊन एकनाथ शिंदेच्या शिवसेना पक्षाकडून अन्नधान्याचे किट वाटप करताना ज्योती वाघमारे यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना कॉल केला.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना जाब विचारण्याचा प्रयत्न ज्योती वाघमारे यांनी केला. या गावाची लोकसंख्या इतकी मोठी आहे. कलेक्टर साहेब प्रशासनाकडून खूपच कमी संख्येत किट वाटप केले जात आहे असा प्रश्न ज्योती वाघमारे यांनी केला. यावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उत्तर देताना सांगितले की, ‘आम्ही शक्य होईल तितकी मदत करत आहोत. तुम्ही सध्या त्या गावात आहात तर तुम्ही किती किट आणल्या आहेत.'(slapped) त्यावर ज्योती वाघमारे या तोंडघशी पडल्या. तीन हजार लोकसंख्या असलेल्या गावात ज्योती वाघमारेनी शिवसेना पक्षाकडून फक्त २०० किट वाटप करण्यासाठी आल्या होत्या. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी फोन वरून बोलताना उलट ज्योती वाघमारेना खडेबोल सुनावले. ‘आता ही राजकारण करण्याची वेळ नाही, तुमचं राजकारण नंतर करा.’, असे त्यांनी सांगितले.
राजकारण नंतर करा, जिल्हाधिकाऱ्यांनी शिंदेसेनेच्या महिला नेत्याला झापलं; नेमकं झालं काय? पाहा VIDEO #Saamtv #Shivsena #Jyotiwaghmare #Solapur https://t.co/XWKx56f2Ud
— SaamTV News (@saamTVnews) September 29, 2025
जिल्हाधिकारी आणि ज्योती वाघमारे यांच्या संभाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओवर स्पष्टीकरण देताना ज्योती वाघमारे म्हणाल्या की, ‘मी जिल्हाधिकाऱ्यांना दोन नंबर धंद्याला संरक्षण देण्यासाठी, टेंडरसाठी किंवा बेकायदेशीर कामासाठी कॉल केलेला नव्हता. जर पूरग्रस्त गावात प्रशासनाचे जेवण पोहोचत नसल्याचे प्रशासनाला सांगितले तर तो माझा गुन्हा आहे का? गोरगरिबांचा आवाज बनणं गुन्हा असेल तर तो मी हजार वेळा करेल. गावात मदत पोहोचत नसल्याने मी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला.(slapped) त्यात मी त्यांना एकेरी भाषा वापरलेली आहे का? कोणत्या नेत्याच्या नावाने धमक्या दिल्यात का? त्यांना शिवीगाळ केलीय का? मदत पोहोचली नाही हे सांगितल्यानंतर ‘तुम्ही किती मदत दिली’ असं विचारून राजकारण कोण करतंय हे जनतेने सांगावं. ज्यांच्या पायाला चिखल देखील लागला नाही ते लोक मला ट्रोल करत आहेत. मात्र मी त्यांना भीक घालत नाही.’
हेही वाचा :
कुलदीप यादवची ऐतिहासिक कामगिरी,
भारतातील प्रत्येक शहरात पेट्रोलचा दर वेगवेगळा का आहे?
सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा राजगिरा रताळ्याच्या खुसखुशीत पुऱ्या!