जीएसटी परिषदेच्या अतिशय महत्त्वाच्या बैठकीदरम्यान या करप्रणालीत (GST)काही महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यानंतर 400 हून अधिक वस्तूंचे दर घटले, ज्यामध्ये सामान्यांची बचत आणखी वाढवणं हा एकमेव हेतू यामागे ठेवण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात हे दर कमी होऊनही सामान्यांपर्यंत या निर्णयाचा थेट लाभ पोहोचताना दिसत नाही. ई कॉमर्स संकेतस्थळांवर ही बाब प्रकर्षानं जाणवते आणि मग एकच प्रश्न उपस्थित होतो, या दरकपातीचा नेमका फायदा कोणाला?प्रत्यक्षात GST दरांमधील बदल 22 सप्टेंबरनंतर लागू करण्यात आला.

यामध्ये 5, 12 आणि 18, 28 टक्क्यांची विभागणी एकत्र करत 5 आणि 18 टक्के अशा दोन श्रेणींपुरताच जीएसटी प्रणाली लागू करण्यात आली होती. यामध्ये दैनंदिन वापरातील 99 टक्के गोष्टी स्वस्त होणं (GST)अपेक्षित होतं. मात्र तसं झालं नाही.केंद्राकडून हा निर्णय घेण्यात आल्यानंतर कर कपातीचा थेट फायदा सामान्यांना मिळण्यासाठी सरकारनं काही मार्ग अवलंबले आणि हा एकमेव हेतू केंद्रस्थानी ठेवला.

अर्थ मंत्रालयाकडून 54 जीवनावश्यक औषधांच्या दरावर लक्ष ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले असून, यामध्ये तूप, शॅम्पू, टूथपेस्ट, एअर कंडिशनर अशा वस्तूंचाही समावेश आहे. (GST)इथुन पुढं दर महिन्याला या वस्तूंचे दर केंद्राकडे पाठवण्यात येणार आहेत.दरम्यान काही कंपन्यांच्या माहितीनुसार उत्पादनांच्या करात कपात केली असून या कपातीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवला जात आहे. मात्र नफोखोरी रोखण्यासाठी जी यंत्रणा सक्रिय असणं अपेक्षित होतं, ती अद्याप सक्रिय नसल्याचच इथं स्पष्ट होत होतं आहे. ज्यामुळं आता ई- क़ॉमर्स वेबसाईटवर होणारी ही नफेखोरी नेमकी कशी थांबवली जाणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.

हेही वाचा :

PCOD चा महिलांच्या मानसिक आरोग्यावर होतो खोलवर परिणाम?

महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ;

दिलासादायक ! आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार;

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *