दसरा(Dussehra)हा सण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी सोनं खरेदी करणे शुभ मानले जाते. इतकंच नव्हे तर, या दिवशी घरात नवीन वस्तु आणण्याची परंपरा आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर कार घेण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडते. तसंच, दसऱ्याला घरात पूजा करण्याबरोबरच वाहनांची पूजा करण्याची आपली परंपरा आहे. पण ही परंपरा नेमकी कशी सुरू झाली आणि त्यामागचे कारण काय? जाणून घेऊयात सविस्तर

दसरा(Dussehra) किंवा विजयादशमीला एकीकडे दुर्गा मातेने महिषासुराचा वध केला होता तर दुसरीकडे प्रभू श्रीरामाने रावणाचा वध केला म्हणून विजयोत्सव साजरा केला जातो. दसरा म्हणजे असत्यावर सत्याचा विजय. पण या सगळ्यात वाहने धुण्याची आणि त्याची पूजा करण्याची परंपरा कुठून आली? यामागचे कारण काय जाणून घेऊयात.
लंका विजयानंतर प्रभू श्रीराम यांनी त्यांना साथ देणाऱ्या सर्वांचे आभार मानले होते. त्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रुपात साथ देणाऱ्या सर्वांचे आभार मानले होते. मग ते मनुष्य असतील, प्राणीमात्रा असतील किंवा मग सजीव-निर्जिव दोन्ही रुपात असलेल्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली होती.
प्रभू श्रीराम यांनी सर्व निर्जिव रुपातील वस्तुंचेही आभार मानले होते. यात सर्वप्रकारचे शस्त्र, अस्त्र, रथ आणि सर्वप्रकारचे वाहने यांच्याप्रतीही आभार मानले होते. कारण त्याच्याशिवाय युद्ध लढलेच जाऊ शकत नव्हते. वाहन म्हणजे रथ, हत्ती आणि अश्व याची गणनाही वाहनांमध्येच होत होती.

आज जी आपण वाहन पूजा करतो ते एकप्रकारची रथ-पूजनचा पर्याय आहे. प्राचीन भारतात रथ-पूजन, अश्व-पूजन, शस्त्र-पूजन करुन ही परंपरा पाळली जात होती. मात्र आता ही परंपरा वाहन पूजेत बदलली आहे. आपल्या वाहनांप्रती कृतज्ञता व्यक्त करुन ही परंपरा जपली जाते.
शुभ आणि सुरक्षित प्रवासासाठी
दसरा हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचा दिवस आहे. या दिवशी वाहनाची पूजा करून, स्वस्तिक (शुभ चिन्हे) काढून, फूलहार घालून आणि रक्षासूत्र बांधून प्रवासात कोणतीही अडचण येऊ नये आणि वाहने सुरक्षित राहावीत अशी प्रार्थना केली जाते.
पूजा करण्याची पद्धत
वाहनावर सर्वात पहिले आंब्याच्या डहाळ्याने तीनवेळा पाणी शि़डकावण्यात येते
त्यानंतर कुंकवाने वाहनावर छोटासा स्वस्तिक काढा. स्वस्तिक शुभ असण्याबरोबरच उर्जादायकदेखील असते.
त्यानंतर वाहनाला फुलांचा हार घातला जातो.
त्यांनतर नारळ घेऊन तो वाहनावरुन सातवेळा फिरवावा आणि मग वाहनाच्या पुढे फोडावा.
हेही वाचा :
PCOD चा महिलांच्या मानसिक आरोग्यावर होतो खोलवर परिणाम?
महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ;
दिलासादायक ! आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार;