ग्रहांची होणारी हालचाल व्यक्तीच्या प्रत्येक जीवनावर बदल घडून येतो. हा बदल दिवाळीसारख्या मोठ्या सणावर झाला असल्यास त्याचा परिणाम अनेक पटींनी होणार आहे. दिवाळी एका विशेष खगोलीय घटनेसह येत आहे. दिवाळीमध्ये ग्रहांच्या हालचालीनुसार आजचा दिवस विशेष राहील. जो काही एका राशीच्या(zodiac sign) लोकांसाठी खूप शुभ राहणार आहे.

दिवाळी, 20 ऑक्टोबर रोजी शनिदेव वक्री होत आहे म्हणजेच तो विरुद्ध दिशेने मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. न्याय आणि कर्माचा देवता असलेल्या शनिची ही प्रतिगामी गती ही एक दुर्मिळ घटना आहे, जी अनेक वर्षांनंतर घडते. ही युती चार राशींच्या लोकांसाठी संपत्ती, प्रवास आणि प्रगतीचे दरवाजे उघडू शकते. शनि योगाचा(zodiac sign) कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या
वृषभ रास
दिवाळीमध्ये शनिची वक्री गती वृषभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. या काळात तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो तसेच आर्थिक स्थिती देखील चांगली राहील. तुमचे अडकलेले पैसे या काळात तुम्हाला परत मिळतील. तुम्हाला अनपेक्षित फायदा होऊ शकतो. पण तुमच्या सुखसोयी आणि सुखसोयींमध्येही वाढ होईल. या काळात तुमच्या असलेल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुमच्या कारकिर्दीत अचानक प्रगती होईल. यासोबतच तुम्हाला पदोन्नती, नवीन जबाबदाऱ्या किंवा एखादा मोठा प्रकल्प मिळू शकतो.
मिथुन रास
दिवाळीमध्ये शनिची वक्री गती मिथुन राशीच्या(zodiac sign) लोकांसाठी फायदेशीर असणार आहे. या काळात तुम्हाला नोकरी आणि व्यवसायामध्ये अपेक्षित लाभ होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्यां लोकांना अपेक्षित फायदा होऊ शकतो. नवीन सौदे किंवा गुंतवणूक नफा मिळवून देण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना अपेक्षित फायदा होईल. बेरोजगारांना नोकरी मिळू शकते, तर नोकरी करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. मालमत्ता, लोखंड, तेल, खनिजे किंवा काळ्या वस्तूंशी संबंधित असणाऱ्या लोकांना व्यवसायात अपेक्षित फायदा मिळू शकतो. हा काळ गुंतवणुकीसाठी खूप फायदेशीर राहील.

मकर रास
मकर राशीच्या लोकांसाठी दिवाळीमध्ये होणारी शनिची वक्री लाभदायक ठरणार आहे. या काळामध्ये मकर राशीच्या लोकांना सकारात्मक परिणाम मिळतील. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. नवीन मालमत्ता, गाडी किंवा घर खरेदी करण्याचा विचार करत असल्यास अपेक्षित यश मिळू शकते. वैवाहिक जीवन आनंदी राहील. या काळामध्ये तुम्हाला संपत्ती, आदर आणि आनंद घेऊन येऊ शकते.
कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांवर शनि ग्रहाचा विशेष प्रभाव राहील. त्याच्या होणाऱ्या या वक्री गतीमुळे दिवाळीत तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात. या काळात तुम्हाला आर्थिक लाभ देखील होऊ शकतात. तसेच या काळात तुमच्या उत्पन्नात देखील वाढ होऊ शकते. तुमचे अडकलेले पैसे देखील तुम्हाला परत मिळू शकतात. तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. यावेळी तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल तसेच तुमच्यामधील आत्मविश्वास देखील वाढेल.
(टीप : धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे.)
हेही वाचा :
लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेचे सूचक विधान
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठी भेट! मोदी सरकारकडून गव्हाच्या MPS मध्ये १६० रुपयांची वाढ
मी थोड्या दिवसाचा पाहुणा, आता…; मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान