मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे.(surprised)मावशी आणि पुतण्यामधील नातेसंबंध कलंकित करणारा प्रकार उघडकीस आला आहे. केवळ १९ वर्षांचा तरुण आपल्या २५ वर्षीय मावशीच्या प्रेमात पडला आणि तिच्याशी लग्न करण्यासाठी त्याने बनावट कागदपत्रांची निर्मिती केल्याचे समोर आले आहे. कुटुंबाला आणि कायद्याला फसवून हा तरुण आणि त्याची मावशी सध्या फरार आहेतही घटना शील नगर येथील आहे. रितेश धाकड नावाचा १९ वर्षीय तरुण आपल्या मावशीवर प्रेम करत होता. लग्नासाठी कायदेशीर वयगाठ आवश्यक असल्याने त्याने त्याचे जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि पॅन कार्डमध्ये फेरफार केली आणि स्वतःचे वय दोन वर्षे अधिक दाखवले. त्याचे खरे जन्मवर्ष २००५ असून वय १९ वर्षे होते. पण कागदपत्रांमध्ये वय २१ वर्षे दाखवण्यात आले. या खोट्या कागदपत्रांच्या आधारे रितेश आणि त्याच्या मावशीने न्यायालयात लग्नासाठी अर्ज दाखल केला आणि २४ जून रोजी घरातून फरार झाले.

कुटुंबाला संशय आल्यानंतर त्यांच्या काकांनी, आकाश सिंग राजपूत यांनी,(surprised) माहिती अधिकाराद्वारे रितेशची दहावीची गुणपत्रिका मिळवली. त्यातून रितेशचे खरे जन्मवर्ष २००५ असल्याचा पुरावा मिळाला आणि कागदपत्रांमधील २००३ दाखवलेले वर्ष खोटे

या घटनेबाबत सीएसपी रॉबिन जैन यांनी सांगितले की,(surprised) कागदपत्रे खोटी करून फरार झालेल्या या जोडप्याचा शोध सुरू आहे. पोलिसांकडून अनेक ठिकाणी छापे टाकून तपास सुरू आहे आणि दोघांना लवकरच अटक केली जाईल. या प्रकरणामुळे कुटुंबीयांमध्ये तणाव निर्माण झाला असून समाजातही तीव्र खळबळ उडाली आहे. स्थानिक स्तरावर या घटनेकडे अवैध नातेसंबंध आणि कायद्याची पायमल्ली म्हणून पाहिले जात आहे.
हेही वाचा :
लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेचे सूचक विधान
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठी भेट! मोदी सरकारकडून गव्हाच्या MPS मध्ये १६० रुपयांची वाढ
मी थोड्या दिवसाचा पाहुणा, आता…; मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधानEdit