सहा महिन्यापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की मी थोड्या दिवसांचा पाहुणा आहे असं मोठं विधान मनोज जरांगे यांनी केलं आहे. नारायणगाव येथे आयोजित दसरा मेळाव्यात(reservation) बोलताना त्यांनी हे विधान केलं. आज इथे उपस्थित राहून मराठा बांधवांनी त्यांचं मोठेपण सिद्ध केलं आहे असंही त्यांनी म्हटलं.

गरिबांच कल्याण करू द्या मुंबईला चला असं मी म्हणालो होतो. मी आहे तोपर्यंत मला मराठा समाजाला आरक्षण(reservation) द्यायचं आहे. मला साथ द्या,समाजाच्या लेकरांचं कल्याण करू शकतो. जीआर निघाला आहे आता मला चिंता राहिलेली नाही.जीवनात येऊन जे सिद्ध करायचं आहे ते मी केलं आहे असं ते म्हणाले आहेत.
“मी आता थोड्या दिवसाचा पाहुणा असो किंवा खूप दिवसाचा, मला आता चिंता नाही. जे सिद्द करायचं होतं ते केलं आहे. गरिब मराठा समाज होरपळताना दिसत नव्हता. मी कधीही नाटक केलं नाही. मी कधीही समाजाला खोटं बोललो नाही. ही गोष्ट खरी आहे की, एखाद्या वेळी एक दोन पावलं पुढे मागं सरकवलं असेल.
एखाद्या वेळी चूक झालीही असेल. मला दिसत होतं समाजा खूप तडफडत आहे. लेकी बाळी, पोरं बाळं मोठं करायचं असेल तर शेतीसोबत आरक्षणाचा आधार गरजेचा आहे. रात्रंदिवस तुटून पडलो. माझ्या समाजाच हट्ट होता. लेकरा बाळाला नोकरीपासून, शिक्षणापासून लांब राहावं लागू नये यासाठी प्रयत्न होता,” असं त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा :
२ लाख घेऊन दलालाने जुळवलं लग्न, पहिल्याच रात्री नवरीने…
‘मराठा आरक्षणाचा लढा आणखी तीव्र होणार’; खासदार शाहू महाराज यांचा इशारा
कार अपघातात कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू; घटनेचा थरारक Video