गुजराती चित्रपटांमध्ये भूमिका देण्याचे आमिष दाखवून एका १५ वर्षीय मुलीवर (drugged)दीड वर्ष अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी एका २५ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. स्वत:ला चित्रपट निर्माता असल्याचा त्याचा दावा असून, त्याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीने विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. १ ऑक्टोबर रोजी दाखल झालेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करून आरोपीला अटक केली.

तक्रारीनुसार, २ वर्षांपूर्वी मुलीला इन्स्टाग्रामवर एक पोस्ट दिसली होती. त्या पोस्टमध्ये गुजराती चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा असलेल्या लोकांना संधी देण्याचे सांगण्यात आले होते. (drugged)या पोस्टमधील संपर्क क्रमांकावर कॉल करून ती मुलगी आणि तिची आई राजकोटमधील साधू वासवानी रोडवरील आरोपीच्या कार्यालयात गेल्या. त्यानंतर आरोपीने तिला ऑडिशनसाठी बोलावले. अभिनय कौशल्य वाढवण्यासाठी सराव करावा लागेल असे सांगितले. मुलगी अभिनय चांगल्या पद्धतीने करत असेल तर तिला प्रमुख भूमिका देण्याचे त्याने आश्वासन दिले, असे एफआयआरमध्ये नमूद आहे.
एका प्रशिक्षण सत्रादरम्यान आरोपीने तिला इंटिमेट सीन करण्याची मागणी केली. त्यानंतर तिला अयोग्य पद्धतीने स्पर्श केला. तसेच किस घेण्याचा प्रयत्न केला. मुलीने यावर विरोध केला आणि सरावासाठी जाण्यास नकार दिला. मात्र आरोपीने तिच्या आईला फोन करून पुन्हा येण्यास सांगितले.त्यानंतर आरोपीने तिला इव्हेंट मॅनेजमेंटच्या कामाच्या नावाखाली पुन्हा कार्यालयात बोलावले. तिला वारंवार मद्यपानाचे ड्रिंक देऊन अत्याचार केला. (drugged)पुढील १८ महिन्यांमध्ये त्याने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप मुलीने केला आहे.

चित्रपटांमध्ये काम न देण्याची धमकी देऊन आरोपीने तिला गप्प बसण्यास भाग पाडले होते.(drugged)या प्रकरणी तपास अधिकारी हरेश पटेल यांनी सांगितले की, आरोपीविरुद्ध बालक लैंगिक अत्याचार संरक्षण आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून महत्त्वाचे पुरावे जप्त केले असून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
हेही वाचा :
‘जास्त उडू नकोस..’ फराहने पापाराझींसमोरच कुक दिलीपला सुनावलं, वागणूक पाहून चाहते…
सांगलीत भरवस्तीत थरार; बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न, नागरिकांनी पाठलाग करत पकडले
फोन, टीव्ही, फ्रिज EMI वर घेताय? RBI च्या निर्णयामुळे बसणार फटका; वाचा सविस्तर