ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत भारत अ संघाने (won)अपवादात्मक कामगिरी केली. भारत अ संघाने केवळ ४६ षटकांत २ विकेट राखून सामना जिंकला. यासह, श्रेयस अय्यरच्या संघाने एकदिवसीय मालिका २-१ अशी जिंकली.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सध्या कसोटी मालिका सुरु आहे तर दुसरीकडे भारताचा अ संघ हा सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका पार पडली आहे. यामध्ये शेवटच्या(won) सामन्यामध्ये भारतीय संघाची कौतुकास्पद कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत भारत अ संघाने अपवादात्मक कामगिरी केली. भारताचा संघ लवकरच ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेमध्ये भारतीय संघाची कमान ही शुभमन गिलकडे असणार आहे तर टीम इंडियाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर असणार आहे.

त्याचबरोबर रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही बऱ्याच महिन्यानंतर मालिका खेळताना दिसणार आहेत. पहिल्या दोन सामन्यांनंतर मालिका १-१ अशी बरोबरीत होती. तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जॅक एडवर्ड्सच्या संघाने ४९.१ षटकांत सर्व विकेट गमावून ३१७ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारत अ संघाने केवळ ४६ षटकांत २ विकेट राखून सामना जिंकला. यासह, श्रेयस अय्यरच्या संघाने एकदिवसीय मालिका २-१ अशी जिंकली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाने कूपर कॉनोलीने फक्त ४९ चेंडूत ६४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, ज्यामध्ये पाच चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. लियाम स्कॉटनेही ७३ धावांची आक्रमक खेळी केली. कर्णधार जॅक एडवर्ड्सनेही ७४ चेंडूत ८ चौकार आणि तीन षटकारांसह ८९ धावांची धमाकेदार खेळी केली. या तीन शानदार खेळींमुळे ऑस्ट्रेलिया अ संघाने ९.१ षटकांत सर्वबाद होण्यापूर्वी ३१७ धावा केल्या. भारत अ संघाकडून अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. आयुष बदोनी यांनीही दोन बळी घेतले.
लक्ष्याचा पाठलाग करताना, भारत अ संघाकडून यष्टिरक्षक आणि सलामीवीर फलंदाज प्रभसिमरन सिंगने फक्त ६८ चेंडूत १०२ धावांची धमाकेदार खेळी केली. या डावात प्रभसिमरनने ८ चौकार आणि ७ उत्तुंग षटकार ठोकले. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने ६२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. अय्यरला साथ देत रियान परागनेही ६२ धावा केल्या, ज्यामुळे टीम इंडियाला २ विकेटने विजय मिळवता आला. ऑस्ट्रेलिया अ संघाकडून तनवीर संघा आणि टॉड मर्फीने प्रत्येकी ४ विकेट घेतल्या. भारत अ संघाने दुसरा सामना गमावला. अय्यरच्या संघाने पहिला सामनाही जिंकला होता.
हेही वाचा :
6 महिन्यात पैसे दुप्पट!
केस ओढले, फरपटत नेलं अन्…. ;
आजच खाण्यात ‘या’ खाद्यपदार्थांचे सेवन करा….