योग्य आहार, नियमित व्यायाम आणि वेळेवर तपासणी! (cancer)या तीन गोष्टी स्तनाच्या कर्करोगापासून संरक्षण देऊ शकतात. थोडं स्वतःकडे लक्ष द्या, कारण तुमचं आरोग्यच तुमचं खरं सौंदर्य आहे.

चला जाणून घेऊया न्यूट्रिशनिस्ट लीमा महाजन (cancer)यांच्या मते स्तनाचा कर्करोग टाळण्यासाठी उपयुक्त ६ अन्नपदार्थांविषयी:

डाळिंब :

डाळिंब केवळ स्वादिष्ट फळ नाही, तर ते अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. यात एलॅगिटॅनिन्स नावाचे घटक असतात जे कर्करोग पेशींची वाढ थांबवतात आणि शरीरातील एस्ट्रोजेनचे प्रमाण संतुलित ठेवतात.

क्रूसीफेरस भाज्या :

ब्रोकली, फुलकोबी, पत्ता कोबी यांसारख्या भाज्यांमध्ये सल्फोराफेन नावाचे घटक असतात, जे कर्करोगविरोधी असून शरीरातील सूज आणि विषारी घटक कमी करतात.

सोया आणि डाळी :

सोयाबीन, टोफू आणि डाळी प्रोटीनचे उत्तम स्रोत आहेत. यात आइसोफ्लेवोन्स असतात जे एस्ट्रोजेनचे प्रमाण नियंत्रित ठेवतात. नियमितपणे सोया पदार्थ खाल्ल्यास ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होतो.

आवळा आणि पेरू :

हे दोन्ही फळे व्हिटॅमिन C ने भरलेली आहेत. व्हिटॅमिन C शरीरातील फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान टाळते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. पेरूमध्ये असणारे लायकोपीन कर्करोगाविरुद्ध लढण्यास मदत करते.

ऑलिव्ह तेल :

स्वयंपाकासाठी ऑलिव्ह तेलाचा वापर करा. यात असणारा ओलेओकॅन्थॉल हा घटक कर्करोग पेशी नष्ट करण्यात मदत करतो आणि शरीरातील सूज कमी करतो.

अळशीचे बी :

अळशीच्या बियांमध्ये लिग्नॅन्स आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स असतात. हे घटक हार्मोनसंबंधी कर्करोग, विशेषतः स्तनाचा कर्करोग, टाळण्यासाठी उपयुक्त ठरतात. तुम्ही हे दही, सॅलड किंवा स्मूदीमध्ये घालून खाऊ शकता.

हेही वाचा :

 ‘जास्त उडू नकोस..’ फराहने पापाराझींसमोरच कुक दिलीपला सुनावलं, वागणूक पाहून चाहते…

सांगलीत भरवस्तीत थरार; बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न, नागरिकांनी पाठलाग करत पकडले

फोन, टीव्ही, फ्रिज EMI वर घेताय? RBI च्या निर्णयामुळे बसणार फटका; वाचा सविस्तर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *