दिल्लीत १८ वर्षीय एमबीबीएस विद्यार्थिनीवर(student) तिच्या मित्राने गंभीर लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडितेची मूळ रहिवासी हरियाणा, जींद जिल्हा आहे आणि ती दिल्लीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहात राहत होती. ती स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती. ९ सप्टेंबर रोजी तिच्या मित्राच्या जाळ्यात ती अडकली.

मित्राने पार्टीच्या बहाण्याने पीडितेला एका हॉटेलवर बोलावले, जिथे त्याने तिच्या कोल्ड्रिंकमध्ये अमली पदार्थ टाकले. हे पदार्थ पिऊन पीडितेची शुद्ध हरपली, आणि बेशुद्ध अवस्थेत तिच्यावर त्याच्यासह त्याच्या मित्रांनी बलात्कार केला. तसेच, आरोपींनी तिचे व्हिडिओ आणि फोटो काढले आणि त्यांचा वापर करून पीडितेला वारंवार ब्लॅकमेल केले, तसेच कोणाला सांगितल्यास व्हायरल करण्याची धमकी दिली.

या सततच्या ब्लॅकमेलिंगमुळे पीडितेने(student) ३ ऑक्टोबर रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारावर आरोपी अमनप्रीत आणि त्याचे दोन मित्र विरोधात भारतीय दंड संहिता कलम ६४, ६६ आणि ६९ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. सध्या आरोपी फरार असून पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी अनेक पथके तयार केली आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, लवकरच आरोपींना जेरबंद करण्यात येणार आहे.
हेही वाचा :
रस्त्यावर माझी पँट उतरवली गेली… महेश भट्ट यांनी सांगितला धक्कादायक…
बायकोशी घटस्फोट घेतल्यावर आनंद गगनात मावेना, आईने दुधाचा अभिषेक घातला
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचं नवं फीचर ,Map मध्ये दिसणार रिेल्स, स्टोरी आणि पोस्ट्स