एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेने(woman) एका तरुणाला घरात बोलवून त्याच्या गुप्तांगावर चाकूने हल्ला केल्याचे समोर आले आहे. यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर हल्ला झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात तडफडू लागला. तरुणाच्या व्हिवळण्याच्या आवाज ऐकून शेजारी पोहोचले. त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र तरुणाची प्रकृती गंभीर जखमी असल्याने त्याला वाराणसी येथील रुग्णालयात हलवण्यात आले. पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले असून चौकशी करण्यात येत आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील आहे.

याबाबत अधिकची माहिती अशी की, ही धक्कादायक घटना सरपतहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डकहा गावात घडली आहे. या गावातील दोन मुलांची आई असलेल्या महिलेने(woman) मंगळवारी उशिरा रात्री गावातीलच एका २२ वर्षीय तरुणाला आपल्या घरी बोलावले आहे. नंतर त्या विवाहितेने त्या तरुणाच्या गुप्तांगावर चाकूने वार केला. त्यामुळे तो रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर कोसळला. त्याच्यावर आरडाओरडीनंतर शेजारच्या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी हि गोष्ट तरुणाच्या कुटुंबीयांना कळवली. कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती देऊन जखमीला जिल्हा रुग्णालयात नेले, जिथून त्याला पुढील उपचारासाठी वाराणसी येथे पाठवण्यात आले आहे.
हल्ला करणाऱ्या महिलेचे पती अहमदाबाद येथे नोकरी करतात. तिने त्या तरुणावर असा हल्ला का केला, याबाबत अजूनही गूढ कायम आहे. त्यांच्या दरम्यान कथित प्रेमसंबंध होते आणि त्यातूनच काही वैयक्तिक वाद निर्माण झाल्याने हि घटना घडली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. सध्या जखमी प्रकृती गंभीर असून त्याच्यावर वाराणसीत उपचार सुरु आहेत.

या प्रकरणाबाबत शाहगंजचे उपअधीक्षक अजीत सिंह चौहान यांनी सांगितले की, “डकहा गावात मंगळवारी उशिरा रात्री एका महिलेने गावातीलच तरुणाला बोलावून त्याच्या गुप्तांगावर चाकूने हल्ला केला. त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारांसाठी वाराणसी येथे हलवण्यात आले आहे. आरोपी महिलेला ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू आहे.”
हेही वाचा :
बाबा वेंगाची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरणार? जगात मोठे संकट येणार?
बायको आणि 6 महिन्यांच्या मुलीला सोडून अभिनेत्याने थाटला दुसरा संसार
MBBS च्या विद्यार्थिनीवर मित्रानेच केले अत्याचार; हॉटेलवर बोलावून बेशुद्धावस्थेत दुष्कृत्य, व्हिडिओही काढले