लग्नात आनंदसोहळा साजरा करणे ही सामान्य गोष्ट असली तरी, तलाकानंतर(divorce) जंगी सेलिब्रेशन करणारा युवक सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये युवक आपल्या आईकडून दुधाने अभिषेक घेताना दिसतो आणि त्यानंतर ‘सुखी घटस्फोट’ असा लिहिलेला केक कापून आनंद साजरा करताना दिसतो.

व्हिडिओमध्ये युवकाच्या आईने त्याच्यावर दूध ओतून त्याचा अभिषेक केला, जे हिंदू संस्कृतीत शुद्धीकरण आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक मानले जाते. त्यानंतर युवक ‘सुखी घटस्फोट’(divorce) असे लिहिलेल्या चॉकलेट केकजवळ येतो आणि हसतमुखाने केक कापतो. केकवर लिहिले होते की, “मी माझ्या माजी पत्नीला १२० ग्रॅम सोने आणि १८ लाख रुपये दिले आहेत.” व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, “कृपया आनंदी रहा, स्वतःचा सन्मान करा. आता मी सिंगल, खुश आणि आजाद आहे. माझं जीवन, माझे नियम!”

युवकाच्या या अनोख्या सेलिब्रेशनला सोशल मीडियावर मिश्र प्रतिसाद मिळाला आहे. काहींनी टीका केली असली, तरी अनेकांनी त्याच्या नव्या सुरुवातीचा आनंद साजरा करण्याच्या पद्धतीचे कौतुक केले. व्हिडिओ पुन्हा शेअर करत युवकाने त्याच्या समर्थन करणाऱ्यांचे आभारही मानले आहेत. घटस्फोटानंतरही आयुष्य नव्या दृष्टिकोनातून कसं जगता येऊ शकतं हे या व्हिडिओने वेगळ्या पद्धतीने दाखवले आहे.

हेही वाचा :

एकामागून एक 200 सिलेंडरचा स्फोट; मेणासारखा वितळला ट्रक

साहेब, त्याच्याकडे माझा अश्लील व्हिडीओ; महिला शेजारच्या…..

कफ सिरपसाठी डॉक्टरांची चिठ्ठी अनिवार्य….

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *