उत्तर प्रदेशातील कासगंजमध्ये एका भयंकर हत्येची घटना समोर आली आहे. सिद्धपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील नगला परसी गावात, सासूच्या प्रेमात वेडा झालेल्या पतीने आपल्या पत्नी शिवानीची हत्या केली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला असून, पती प्रमोद आणि सासरकुटुंबाविरुद्ध हत्येचा(murder) गुन्हा दाखल केला आहे.

शिवानीचं प्रमोदशी लग्न २०१८ मध्ये झालं होतं. कुटुंबाच्या आरोपानुसार, प्रमोदची सासूशी प्रेमसंबंध असल्यामुळे जोडप्यात सतत भांडणं होत असत. या भांडणामुळे प्रमोद सतत शिवानीवर मारहाण करायचा. दोन दिवसांपूर्वी झालेल्या रागाच्या भरात त्याने पत्नीची हत्या (murder)केली, असा संशय पोलिसांना आहे.

या घटनेनंतर आरोपी पती प्रमोद आपल्या कुटुंबासह घरातून पळून गेला आहे. तसेच, या प्रकरणाशी संबंधित काही आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस सध्या सर्व आरोपींचा शोध घेत आहेत आणि तपास सुरु आहे.
हेही वाचा :
भारत-पाक सामने थांबवा.., त्यांचा वापर..’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा घणाघात
22 वर्षीय तरुणीच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक पडून मृत्यू
Hardik Pandya कडून Lamborghini Car खरेदी; किंमत अशी की….