जोगेश्वरीतील 22 वर्षीय तरुणीच्या डोक्यात(head) सिमेंट ब्लॉक पडून मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी सकाळी 9.30 च्या सुमारास घडली. 22 वर्षीय संस्कृती अनिल अमिन ऑफिसला जात असताना तिच्या डोक्यावर सिमेंटचा ब्लॉक पडला. संस्कृती अमिन हीने हॉटेल मॅनेजमेंट केला असून ती 5 दिवसांपूर्वीच कामाला लागली होती.

सकाळी 9.30 च्या सुमारास ऑफिसला जात असताना तिच्या डोक्यावर(head) सिमेंट ब्लॉक पडला.संस्कृतीच्या शेजारी धोबीघाट, मजास वाडी परिसरात श्रद्धा कंस्ट्रक्शनचं काम सुरु असून तेथील सिमेंटचा ब्लॉक संस्कृतीच्या डोक्यावर पडला. यानंतर तिला तात्काळ ट्रामा केअर हॉस्पीटलमध्ये दाखल केलं. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
काही क्षणात होत्याचं नव्हतं झाल्यामुळे संस्कृतीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही घटना घडली तेव्हा तिची आजी बाहेरच होती. त्यांच्यासमोरच हा प्रकार घडल्यामुळे त्यांना धक्का बसला आहे. बांधकामाच्या ठिकाणी झालेल्या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप मुलीचा जीव गेला आहे.
धोबी घाट, मजासवाडी हा परिसर अतिशय रहदारीचा आहे. या ठिकाणाहून सकाळी ऑफिसला आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची लगबग असते. तसेच हा परिसर मार्केटचा भाग आहे. यामुळे ग्राहकांची देखील या ठिकाणी रहदारी असते. अशावेळी ही दुर्घटना घडल्यामुळे परिसरात भितीचं वातावरण आहे. जोगेश्वरीतील या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. जोगेश्वरी येथील देवभूमी कन्स्ट्रक्शन साईटवर असाच एक प्रकार घडला.

जोगेश्वरी पूर्व येथील देवभूमि कन्स्ट्रक्शन साईटवर एक धक्कादायक घटना घडली आहे. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास तीन लहान मुलं खेळण्याच्या नादात तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली. या घटनेत एका मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन मुलं गंभीररित्या जखमी झाली आहेत. ज्या इमारतीमध्ये ही घटना घडली, त्या इमारतीचं बांधकाम अजूनही सुरू आहे. जखमी मुलं त्याच इमारतीमध्ये राहणाऱ्या कामगारांची आहेत. जोगेश्वरी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे बांधकाम साईटवरील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा :
विवाहित महिलेने तरुणाच्या गुप्तांगावर केला चाकूने हल्ला…
बारावी उत्तीर्णांसाठी NIA मध्ये नोकरीची संधी….
बाबा वेंगाची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरणार? जगात मोठे संकट येणार?