महाराष्ट्रात येत्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र महायुती आणि महाविकास (politics)आघाडी एकत्र लढणार आहेत की प्रत्येक पक्ष स्वतःच्या स्वबळाची चाचपणी करणार, याबाबत अजून स्पष्टता नाही.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतरणाला वेग आला आहे. महाविकास आघाडीतील अनेक नेते महायुतीत प्रवेश करत आहेत, तसेच महायुतीतही घटक पक्षातील नेते एकमेकांच्या पक्षात जात असल्याचे पाहायला मिळत आहे.
कोल्हापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार आणि गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष रणजीतसिंह पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केले आहेत. हे पक्षप्रवेश प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत पार पडले.
एकीकडे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या झेंडीखालीच लढवल्या जाणार आहेत. मात्र राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी काही दिवसांपूर्वी स्वबळाचे संकेत दिले होते, तर महायुतीच्या घटक पक्षातील नेतेही एकमेकांच्या पक्षात प्रवेश करत आहेत, त्यामुळे निवडणुकीची रणनीती अजूनही गोंधळात आहे.

महाविकास आघाडीचे भवितव्यही अस्पष्ट आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची या महापालिका निवडणुकीसाठी युती होणार का, हे अजून ठरलेले नाही(politics). त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी राजकीय वर्तुळात उत्सुकता आणि गोंधळ दोन्ही वाढले आहे.
हेही वाचा :
कसोटी कर्णधार शुभमन गिलचे ‘या’ दोन माजी कर्णधारांवर भाष्य
एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला
WhatsApp हॅक झालं? लगेच करा ‘या’ ५ गोष्टी; नाहीतर…