अर्नाळा येथील एकाच कुटुंबातील(family) तिघांवर मध्यरात्री प्राणघातक हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला अवघ्या 72तासात अटक करण्याची कामगिरी गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-3 ने केली. चोरीच्या उद्देशाने हा हल्ला केल्याचे निष्पन्न झाले आहे.अर्नाळा-बंदरपाड्यात राहणारे श्रीमती नेत्रा गोवारी (52),त्यांचे वडील जगन्नाथ (76) आणि आई लिला (72) हे झोपेत असतांना त्यांच्यावर अज्ञात इसमाने धारदार कोयत्याने जिवेठार मारण्याचे उद्देशाने वार करुन गंभीर दुखापत केली होती.6ऑक्टोबरच्या पहाटे ३ वाजता घडलेल्या या घटनेने संपुर्ण तालुका हादरुन गेला होता.याप्रकरणी अर्नाळा पोलीस ठाण्यात 109,329 (4),118(2) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-3ने सुरु केला होता.

घटनास्थळी भेट,तांत्रीक विश्लेषण,गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसेलेल्या हल्लेखोराच्या देहबोलीवरुन बंदर पाड्यातच राहणारा दिपेश नाईक (29) हा आरोपी गुन्हे प्रकटीकरण शाखेने निष्पन्न केला.त्यानंतर बुधवारी रात्री घरातून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.त्याची कसून चौकशी केल्यावर कर्जबाजारी झाल्याने चोरीच्या उद्देशाने हा हल्ला केल्याचे कबुल केले.दिपेश नाईक हा गोवारी यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर रहायला आहे.हल्ला केल्यानंतर तो काहीच घडले नाही,अशा हावभावात घरीच रहायला होता.त्याने काढलेल्या सेल्फीवरुन तो महाराष्ट्र सुरक्षा बलात कार्यरत असल्याची माहिती आहे.
चोरीच्या उद्देशाने तो गोवारी यांच्या घरात शिरला होता.मात्र त्यावेळी नेत्रा यांना जाग आली,त्यामुळे त्यांच्यावर दिपेश ने कोयत्याने हल्ला केला आणि त्यानंतर बचावासाठी आलेल्या जगन्नाथ आणि लिला यांच्यावरही हल्ला केल्याचे निष्पन्न झाले आहे.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरिक्षक सुहास कांबळे,उपनिरिक्षक प्रकाश तुपलोंढे,रामचंद्र पाटील,सहाय्यक फौजदार शिवाजी पाटील,संतोष चव्हाण,हवालदार मुकेश तटकरे,सागर बारवकर,प्रशांत पाटील,राकेश पवार,सुनिल पाटील,युवराज वाघमोडे,आतिश पवार,तुषार दळवी,मनोहर तारडे,प्रशांत बोरकर,प्रविण वानखेडे,सागर सोनवणे यांनी ही कामगिरी केली(family).
हेही वाचा :
सोनाक्षी आणि झहीरनं चाहत्यांना दिली गुड न्यूज
video viral:धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केल्याने मिरजेत राडा
अनुकंपा तत्त्वावरील कर्मचाऱ्यांना दिवाळी सानुग्रह अनुदान देण्याची मागणी – उमाकांत दाभोळे